करवाढीच्या निषेधार्थ भाजपाच्या विरोधात शिंदेसेनेचे भिक मागो आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 16:25 IST2026-02-24T16:23:36+5:302026-02-24T16:25:50+5:30

आयुक्तांना निवेदन देत करवाढीचा ठराव रद्द करण्याची मागणी शिंदेसेनेने केली. 

shiv sena shinde group begging protest against BJP to protest tax hike | करवाढीच्या निषेधार्थ भाजपाच्या विरोधात शिंदेसेनेचे भिक मागो आंदोलन

करवाढीच्या निषेधार्थ भाजपाच्या विरोधात शिंदेसेनेचे भिक मागो आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेत सत्ताधारी भाजपाने पहिल्याच महासभेत नागरिकांवर मालमत्ता कराच्या कर योग्य मूल्य दरात तब्बल ६० टक्के पेक्षा जास्त वाढ केली आहे. त्या निषेधार्थ शिंदेसेनेने महापालिकेत भाजपा विरोधात भीक मागो आंदोलन केले. मुख्यालयात घोषणाबाजी करत महापौरांच्या दालना बाहेर ठिय्या मारला तसेच आयुक्तांना निवेदन देत करवाढीचा ठराव रद्द करण्याची मागणी शिंदेसेनेने केली. 

पहिल्याच महासभेत सत्ताधारी भाजपाने भाड्यावरील मालमत्ताच्या करात वाढ करण्याचा निर्णय घेतलाच शिवाय मालमत्ता कराच्या कर योग्य मूल्य दरात ६० टक्के पेक्षा जास्त वाढ केली आहे. कर योग्य मूल्य दरात वाढ केल्याने मालमत्ता कर मध्ये मोठी वाढ होणार आहेच शिवाय रस्ता कर, पाणी पुरवठा लाभकर, मलप्रवाह सुविधा कर, वृक्ष कर, शिक्षण कर, अग्निशमन कर देखील वाढणार आहेत. ह्या कर वाढी वरून टीकेची झोड सुरु आहे. 

मंगळवारी शिंदेसेनेने महापालिकेवर भाजपाच्या करवाढी विरोधात भीकमागो आंदोलन केले. पालिका मुख्यालया बाहेर शिवसैनिकांनी भीक मागत भाजपा विरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर शिवसैनिक हे मुख्यालयात शिरले. दुसऱ्या मजल्यावर भाजपा महापौर डिम्पल मेहता यांच्या दालना बाहेर ठिय्या मारत करवाढ रद्द करण्याची मागणी केली. 

शिंदेसेनेच्या नगरसेविका वंदना पाटील, शर्मिला बगाजी, फ्रिडा डिमेलो, जिल्हाप्रमुख राजू भोईर, जिल्हा संघटक निशा नार्वेकर सह माजी नगरसेवक प्रवीण पाटील व तारा घरत, पदाधिकारी सचिन मांजरेकर, विक्रमप्रताप सिंह, प्रसाद सुर्वे, विकास पाटील आदींनी पालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांना निवेदन दिले. विषयपत्रिकेवर विषय नसताना बेकायदा ठराव केला असून करवाढीचा निर्णय रद्द करण्याची मागणी केली. 

भाजपाचे नेते, नगरसेवक व पदाधिकारी आदीं कडून हि वाढ नागरिकांवर केलेली नाही तर १ एप्रिल नंतर कर आकारणी होणाऱ्या घर - दुकाने आदी मालमत्तां वर लागणार आहे असे सांगत आहेत. मात्र हि नागरिकांची दिशाभूल व खोटेपणा आहे. वास्तविक जुन्या इमारतींच्या पुनर्विकासची कामे सुरु आहेत व शेकडो इमारतींचा पुनर्विकास होणे बाकी आहे. जुन्या इमारतीतून नवीन इमारतीत रहायला जाणाऱ्या शहरवासीयांना देखील ह्या करवाढीचा मोठा बोजा लागणार आहे. चाळी, गावठाण, झोपडपट्टी मधील नागरिकांना देखील नवीन घर बांधल्यावर हि करवाढ लागणार आहे. बीएसयुपी योजनेत रहायला जाणाऱ्या झोपडीवासीयांना पण करवाढीचा मोठा फटका बसणार आहे . नवीन होणाऱ्या इमारतीत बाहेरूनच लोकं येत नसून शहरातीलच मुख्यत्वे नागरिक हे नवीन घरे - दुकाने खरेदी करत असतात असे सचिन मांजरेकर यांनी सांगितले. 

शहरातील नागरिक आणि व्यापारीना आणखी लुटण्यासाठी भाजपाने करवाढ केली असून ह्या आधी भाजपाने अश्याच प्रकारे  करवाढ, पाणी दरवाढ, कचरा कर लावणे असे प्रकार केलेले आहेत. एकीकडे नागरिकांवर करांचा बोझा टाकायचा आणि दुसरीकडे  स्वतःची तुंबडी भरण्यासाठी त्या पैश्यातून टेंडर - टक्केवारी, भ्रष्टाचार, आलिशान दालने आणि खाणेपिणे, पर्यटन आदींवर मौजमजा मारायची असा यांचा लुटमारी मागचा धंदा आहे. महापालिकेचा वर्धापन दिन साजरा करण्यास ५ कोटींची उधळपट्टीचा निर्णय भाजपाने घेतला असून उधळपट्टी ऐवजी नागरिकांचे कर कमी करा असे शाखाप्रमुख महेश शिंदे  म्हणाले. 

आज नागरिक इतक्या मोठ्या संख्येने घामाचा पैसा कर म्हणून पालिकेत भारतात. मात्र त्या नागरिकांना आज पालिके कडून नागरी सुविधा कुठे मिळतात. आज विविध समस्यांनी नागरिक त्रासले आहेत. नागरिकां कडून इतक्या मोठ्या संख्येने कर लुटून शहराची दुरावस्था करून ठेवली आहे त्याचा हिशोब जनतेला द्यावा. भाजपाला भीक मागून आम्ही पैसे गोळा करून देऊ. पण कर वाढ रद्द केली नाही तर आंदोलन आणखी तीव्र करू असा इशारा निशा नार्वेकर यांनी दिला.

Web Title : शिंदे सेना का भाजपा के कर वृद्धि के खिलाफ भीख मांगो आंदोलन।

Web Summary : शिंदे सेना ने मीरा रोड में भाजपा द्वारा संपत्ति कर में वृद्धि के खिलाफ विरोध प्रदर्शन किया, निगम में 'भीख मांगो' आंदोलन किया। उन्होंने कर की बढ़ी हुई दरों को रद्द करने की मांग की, नागरिकों पर बोझ और भ्रष्टाचार का आरोप लगाया।

Web Title : Shinde Sena protests BJP's tax hike with begging in Miraroad.

Web Summary : Shinde Sena protested against BJP's property tax hike in Miraroad, staging a 'begging' protest at the corporation. They demanded the cancellation of the increased tax rates, citing burden on citizens and alleging corruption.