शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

शिवसेनेकडून कर्नाटक सरकारचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 12:38 AM

कल्याण-डोंबिवलीत आंदोलन; घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणला

कल्याण : बेळगाव जिल्ह्यातील निपाणी गावाजवळ असलेल्या मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आला. याबाबत मराठी भाषिकांकडून संताप व्यक्त होत असताना कल्याण-डोंबिवली शहरांत शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी कर्नाटक भाजप सरकारविरोधात निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.कल्याणमधील शिवाजी चौकात हे आंदोलन झाले. कर्नाटकमधील भाजप सरकार मराठीद्वेष्टे आहे. भाजपने छत्रपतींच्या नावाखाली मते मागितली आणि आता असे कृत्य करतात. तत्काळ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा बसवण्यात यावा, अन्यथा वेळप्रसंगी आम्हाला पक्षाकडून आदेश आल्यास तिथे जाऊन आंदोलन करू, असा इशारा शिवसैनिकांच्या वतीने देण्यात आला. शिवसेना कल्याण शाखेतर्फे छेडलेल्या आंदोलनात माजी महापौर तथा विद्यमान नगरसेवक राजेंद्र देवळेकर, केडीएमसी सभागृहनेते प्रकाश पेणकर, परिवहन माजी सभापती रवींद्र कपोते, नगरसेवक महेश गायकवाड, विद्याधर भोईर, विजया पोटे, सचिन बासरे यांसह अन्य आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. डोंबिवलीतही शिवसेनेचे शहराध्यक्ष राजेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी जोडेमारो आंदोलन केले. पूर्वेतील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन केले. दरम्यान, शिवसेनेने मीरा-भार्इंदरमध्येही निषेध करताना कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पांच्या प्रतिमेस चपलांनी चोप दिला.कर्नाटक सरकारविरोधात घोषणाउल्हासनगर : कर्नाटक येथील मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविण्यात आल्याच्या निषेधार्थ शिवसेनेने शिवाजी चौकात मुख्यमंत्री यडुरप्पा यांच्या पुतळ्याला जोडेमारो आंदोलन करून पुतळा जाळण्यात आला. यावेळी कर्नाटक सरकारविरोधात घोषणाबाजी करून शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला.शिवाजी चौकात शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या नेतृत्वाखाली रविवारी दुपारी २ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांचा बेळगावमधील मनगुत्ती गावात बसविलेला पुतळा कर्नाटक सरकारने हटविल्याच्या निषेधार्थ आंदोलन केले. कर्नाटकमधील भाजप सरकार महाराष्ट्र व मराठीद्वेष्टे आहे, असा आरोप चौधरी यांनी केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा त्याजागी बसवा, अन्यथा कर्नाटकात जाऊन आंदोलन करू, असा इशारा दिला.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना