ठाण्यात शिवसैनिकांचा जल्लोष; एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 00:02 IST2019-11-01T00:01:44+5:302019-11-01T00:02:24+5:30

मिठाई वाटून आनंद व्यक्त

Shiv Sena enthusiasts in Thane; Eknath Shinde elected as group leader | ठाण्यात शिवसैनिकांचा जल्लोष; एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी निवड

ठाण्यात शिवसैनिकांचा जल्लोष; एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी निवड

ठाणे : शिवसेनेच्या विधीमंडळ गटनेतेपदी आमदार एकनाथ शिंदे यांची पुन्हा एकमताने निवड झाल्याने ठाण्यात शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. कुठे सोशल मीडियावर तर कुठे फटाक्यांची आतषबाजी करून शिवसैनिकांनी आंनद व्यक्त केला.

ठाण्यातील टेंभीनाक्यावरील आनंद आश्रम येथे शिवसेनेच्या वतीने फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी ढोलताशांचा गजरात प्रत्येक शिवसैनिकाने एकमेकांच्या तोंडात मिठाई भरवली. यामध्ये महिला पधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. शिंदे यांची सलग दुसऱ्यांदा गटनेतेपदी निवड झाली आहे. यावेळेस शिवसेनेचे युवासेनाप्रमुख तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्याला सर्वांनी अनुमोदन दिले. त्यामुळे ठाण्यातील शिवसेनेत आणखी मानचा तुरा रोवला गेला आहे.

एकूणच शिंदे यांची गटनेतेपदी निवड झाल्यानंतर ठाण्यातील आनंद आश्रम येथे महापौर मीनाक्षी शिंदे, उपमहापौर रमाकांत मढवी, सभागृह नेते नरेश म्हस्के , स्थायी समिती सभापती राम रेपाळे यांच्या उपस्थितीत हा जल्लोष करण्यात आला. यावेळी शिंदे यांच्या फोटाला महिलांनी पेढे भरवून आपला आनंद साजरा केला.

Web Title: Shiv Sena enthusiasts in Thane; Eknath Shinde elected as group leader