शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
3
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
4
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
5
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
6
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
7
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
8
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
9
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
10
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
11
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
12
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
13
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
14
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
15
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
16
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
17
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
19
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
20
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

शिवसेना-भाजपची छुपी युती?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2020 1:31 AM

भिवंडी पंचायत समिती निवडणूक : सभापतीपदी भाजपच्या नाईक

लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी :  राज्यात शिवसेनेने भाजपला बाजूला सारून महाआघाडीचे सरकार स्थापन केले. मात्र भिवंडी पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेने भाजपशी छुपी युती केल्याचे मंगळवारी समोर आले. पंचायत समितीत शिवसेनेचे संख्याबळ सर्वाधिक असूनही सभापदीपदी भाजपच्या संध्या नाईक बिनविरोध निवडून आल्याने शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य कमालीचे नाराज झाले आहेत.

भिवंडी पंचायत समितीचे शिवसेनेचे सभापती विकास भोईर यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या सभापतीपदी मंगळवारी तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी अधिक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभागृहात निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजपच्या नाईक यांचा एकमेव अर्ज आल्याने पीठासीन अधिकारी पाटील यांनी नाईक यांची बिनविरोध निवड जाहीर केली.भिवंडी पंचायत समितीत एकूण ४२ सदस्य असून शिवसेनेचे २०, भाजप १९, काँग्रेस २, मनसे १ असे पक्षीय बलाबल आहे. विशेष म्हणजे राज्यात महाआघाडी सत्ता स्थापन होण्याआधीच भिवंडी पंचायत समितीत भाजपविरोधात स्थानिक नेत्यांनी एकत्र येत महायुती स्थापन करून शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसे यांनी एकत्र येत पंचायत समितीवर एकहाती सत्ता आणण्याचा प्रयत्न केला आहे.

 पंचायत समितीत महाआघाडीचे एकूण २३ सदस्य असतानाही अवघे १९ सदस्य असलेल्या भाजपच्या गळ्यात शिवसेनेने सभापतीपदाची बिनविरोध माळ का घातली, असा प्रश्न शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पडला आहे. तर बिनविरोध निवडून आलेल्या नाईक या अवघ्या तीन महिन्यांसाठी सभापती असल्याचे बोलले जात आहे.

वरिष्ठांच्या मनात नेमके काय सुरू आहे?याआधी शिवसेनेचे विकास भोईर हे अवघ्या पाच ते सहा महिन्यांसाठी सभापती होते. त्यामुळे सेना- भाजपचा हा सभापतीपदाचा सारीपाट आणखी किती दिवस चालेल? याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आमच्या पक्षश्रेष्ठींच्या मनात नक्की चाललंय काय हे आम्हाला माहीत नाही, मात्र सेनेच्या वरिष्ठांच्या या निर्णयामुळे आम्ही प्रचंड नाराज आहोत, अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या एका पंचायत समितीच्या सदस्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाBhiwandiभिवंडी