म्हारळ : कल्याण तालुक्यातील मुरबाड महामार्गावर मामणोली गावाजवळ शिंदेसेनेचे पदाधिकारी किरण घोरड (वय ३८) यांची टोळक्यांनी धारदार शस्त्रांनी हल्ला करून हत्या केली. टिटवाळ्यातील गोवेली गावचे ते रहिवासी होते.
शुक्रवारी सायंकाळी सात वाजता घोरड काही कामानिमित्त मामणोली परिसरात गेले होते. त्यावेळी टोळक्यांनी घोरड यांच्यात जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या घोरड यांना गोवेली येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले; परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
घोरड यांच्या डोक्याच्या मागील भागावर आणि कमरेजवळ तीक्ष्ण हत्याराने वार झाल्याचे टिटवाळा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंकज गिरी यांनी सांगितले. या घटनेनंतर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्याने ठाणे ग्रामीणचे सर्वच वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
मुरबाडचे उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल लाड, गणेशपुरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल झालटे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र ठाकूर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोविंद पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक एस. एस. काळे यांसह अन्य पोलिस अधिकारी होते.
सीसीटीव्ही फुटेज अन् इतर धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न
या प्रकरणी कल्याण तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर धागेदोरे तपासत आरोपीचा शोध घेत आहेत.
हल्ल्यात सहभागी असलेल्यांचा कसून शोध सुरू असल्याने अधिक माहिती देण्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारी जितेंद्र ठाकूर यांनी टाळले. जोपर्यंत आरोपी सापडत नाहीत.
तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचे नातेवाइकांनी पोलिसांना सांगितले होते; परंतु, शनिवारी सकाळी कडक पोलिस बंदोबस्तात घोरड यांच्यावर गोवेली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
Web Summary : Kiran Ghorad, a Shiv Sena (Shinde faction) official, was murdered near Kalyan. Assailants attacked him with sharp weapons. Police are investigating using CCTV footage. Tensions are high; the funeral was held under police protection.
Web Summary : कल्याण के पास शिवसेना (शिंदे गुट) के पदाधिकारी किरण घोरड की हत्या कर दी गई। हमलावरों ने धारदार हथियारों से हमला किया। पुलिस सीसीटीवी फुटेज का उपयोग करके जांच कर रही है। तनाव अधिक है; पुलिस सुरक्षा में अंतिम संस्कार किया गया।