- सदानंद नाईक उल्हासनगर - महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांची शिंदेसेनेच्या शिष्टमंडळाने गुरुवारी भेट घेऊन शहरातील विविध समस्या बाबत चर्चा केली. आमदार डॉ.बालाजी किणीकर, महानगरप्रमुख राजेंद्र. चौधरी, अतुल देशमूख यांनी शहर विकासासाठी समस्या सोडविण्याची मागणी केली.
उल्हासनगरातील अनाधिकृत बांधकामे नियमित करण्याकरीता भेडसावणाऱ्या अडचणी शिंदेसेना शिष्टमंडळातील वास्तूविशारद अतुल देशमूख यांनी आयुक्त मनिषा आव्हाळे यांना सांगून त्या अडचणी दूर केल्यास शेकडो अवैध बांधकाम नियमित होणार असल्याचे देशमुख म्हणाले. याशिवाय शहर पूर्वेतील पाणी टंचाई, पाणी सोडण्याच्या वेळा नियमित करणे, पाणी गळती व अनधिकृत नळ जोडणी त्वरित तोडणे, पाणी मिटर बसविणे, घरपट्टी ही घराच्या योग्य मोजमापा प्रमाणे भरण्याकरिता उपाययोजना आखने व थकबाकी वसुल करण्यासाठी योग्य घरपट्टी लवकरात लवकर नागरिकांना उपलब्ध करून देणे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
शहरातील धोकादायक इमारतीना लवकरात लवकर संरक्षित एफएसआय देणे, विविध विकास कामांवर आमदार बालाजी किणीकर यांनी आयुक्ता सोबत चर्चा केली. तसेच विविध समस्या बाबत झालेल्या चर्चेनंतर विकास कामे. मार्गी लागणार असल्याचे आश्वासन आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी दिले. यावेळी शिंदेसेनेचे दिलीप गायकवाड, रमेश चव्हाण, राजेंद्र सिंग भुल्लर महाराज, संदीप गायकवाड, ज्योती माने, समिधा कोरडे, विकास पाटील, सोनी भाटिया, रवी खिलनानी, नविन दुधानी, आदिनाथ कोरडे, गणेश चौघुले, राजू पाटील, राकेश माने, हरीश गुंजाळ यांच्यासह महापालिका अधिकारी उपस्थित होते.
Web Summary : Shinde Sena met Ulhasnagar's Municipal Commissioner, urging resolution of city issues. Discussions included unauthorized construction regularization, water scarcity solutions, and property tax reforms. The Commissioner assured progress.
Web Summary : शिंदे सेना ने उल्हासनगर की नगर आयुक्त से मिलकर शहर की समस्याओं के समाधान का आग्रह किया। अनधिकृत निर्माण नियमितीकरण, पानी की कमी और संपत्ति कर सुधारों पर चर्चा हुई। आयुक्त ने प्रगति का आश्वासन दिया।