शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

शिंदे-चव्हाणांचे गुफ्तगू

By admin | Updated: January 3, 2017 05:43 IST

शिवसेना आणि भाजपाच्या प्रमुख नेत्यांमधील वाद दिवसेंदिवस विकोपाला जात असतानाच ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यात ठाणे महापालिका निवडणुकीत युती

ठाणे : शिवसेना आणि भाजपाच्या प्रमुख नेत्यांमधील वाद दिवसेंदिवस विकोपाला जात असतानाच ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यात ठाणे महापालिका निवडणुकीत युती करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे समजते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पूर्वानुमतीखेरीज स्थानिक नेत्यांमध्ये झालेली ही चर्चा नवे वादळ व वादंग निर्माण करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.शिवसेनेच्या मुखपत्रातून दररोज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले जात असून शिवसेनेचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोले लगावण्याची संधी सोडत नाहीत. भाजपामधील काही नेतेही शिवसेना नेतृत्वावर महापालिकेतील भ्रष्टाचाराचे आरोप करीत आहेत. या पार्श्वभूमीवर ठाण्यातील शिवसेनेच्या नेत्यांना भाजपासोबत युती हवी असून त्यामुळेच ही बैठक झाल्याचे बोलले जात आहे. राज्यात युतीची सत्ता येऊनही ज्यांना मंत्रिपदे, महामंडळांचे अध्यक्षपद किंवा तत्सम सत्तेतील वाटा मिळालेला नाही असे आमदार, नेते युतीमध्ये बिब्बा घालण्याचे काम करीत आहेत. मात्र मंत्रीपद लाभलेले नेते युती व्हावी या भूमिकेचे आहेत.ठाणे महापालिकेच्या निवडणुका स्वतंत्र लढवल्या तर दिल्लीपासून गल्लीपर्यंत सत्तेवर असलेल्या भाजपाचा मुकाबला करण्याकरिता सर्व रसद पुरवण्याची जबाबदारी पालकमंत्री या नात्याने शिंदे यांच्या खांद्यावर येणार आहे. त्यामुळे जागावाटपाबाबत समझोता झाला तर कल्याण-डोंबिवलीत लावावी लागली तशी आर्थिक ताकद लावावी लागणार नाही आणि मंत्रीपद पणाला लावण्याची वेळ येणार नाही, असे शिंदे समर्थकांना वाटते. भाजपाचे संख्याबळ ८ असून स्वतंत्र लढल्यास त्यामध्ये काही पटीत वाढ होईल, याची भाजपाला खात्री आहे. मात्र केडीएमसीसारखा संघर्ष करून सत्तेत दुय्यम भागीदार होण्यापेक्षा संघर्ष टाळून ताकद वाढवता आली तर बरे, असे चव्हाण यांना वाटत असल्याचे त्यांच्या समर्थकांचे मत आहे. शिंदे-चव्हाण यांच्यातील युतीची चर्चा सकारात्मक झाली असून या बैठकीबाबत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनाही पूर्वकल्पना दिली गेली नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मागील महापालिका निवडणुकीच्यावेळी मनसेने शिवसेनेबरोबर युती करावी, अशी गळ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना घालण्याकरिता शिवसेनेच्या ठाण्यातील नेत्यांनी त्यांची भेट घेतली होती. खुद्द राज यांनी जाहीर सभेत हा गौप्यस्फोट केल्यावर उद्धव यांना अंधारात ठेवून ही भेट झाल्याचे उघड झाले होते. त्यानंतर उध्दव यांनी या नेत्यांची चांगलीच खरडपट्टी काढली होती. त्यामुळे आता चव्हाण यांच्यासोबत शिंदे यांनी केलेल्या राजकीय गुफ्तगूची उद्धव कशी दखल घेतात, याकडे दोन्ही पक्षाच्या स्थानिक नेत्यांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)