शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर अवतरले 'शब्द तुझे सूर माझे', कार्यक्रमात रंगली सुरांची मैफिल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 16:31 IST

ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर सुरांची मैफिल रंगली. 

ठळक मुद्देठाण्यातील अभिनय कट्ट्यावर अवतरले 'शब्द तुझे सूर माझे'कार्यक्रमात रंगली सुरांची मैफिल आजकाल गीतातून शब्दांचं महत्व हरवताना दिसतंय : किरण नाकती

ठाणे : ४५० व्या कट्ट्याचे वेध लागलेल्या अभिनय कट्ट्यावर अवतरली आणखी एक सुंदर कलाकृतीची साक्षीदार सुंदर संध्याकाळ. औचित्य होते सूर वृंदावन प्रस्तुत वृंदा दाभोलकर दिग्दर्शित आणि कौस्तुभ दाभोलकर ह्यांनी संगीत दिग्दर्शित केलेला शब्द सुरांच्या मैफलीत सजलेला एक कार्यक्रम 'शब्द तुझे सूर माझे'.

     कविता म्हणजे काय ह्याची सुंदर व्याख्या सांगणारी कविता सादर करीत वृंदा दाभोलकर ह्यांनी कार्यक्रमाला सुंदर सुरुवात केली. वैभव दळवी ह्यांनी शब्दबद्ध केलेली आणि अनुराग गोडबोले ह्यांच संगीत असलेल 'शब्द विखारी तुझे मनाला'हे गीत सादर झाले.वैभव दळवी ह्यांनी आपल्या संग्रहातील काही सुरेख कविता सादर केल्या.अनुराग गोडबोले ह्यांची आणखी एक संगीतरचना आणि अरुण सांगोळेयांची शब्दरचना आणि श्रुती ह्यांनी गायलेले 'एकटे एकटे वाटते मला' हे गीत सादर झाले.कार्यक्रमात पुढे कौस्तुभ दाभोलकर ह्यांचे शब्द अनिरुद्ध जोशी ह्यांच्या स्वरात सजलेले 'वेदनेचे दुःख माझे';अनिरूद्ध गोडबोले ह्यांच संगीत ह्यांचे शब्द पुढे चाललो मी ; शब्द वैभव दळवी स्वर श्रीरंग टेम्बे ह्यांनी दिलेले 'तो शब्द मी दिलेला' ह्या गीतांचे सुंदर सादरीकरण केले. शिवानी गोखले ह्यांनी सखये ह्या कवितेचे सादरीकरण केले त्यानंतर ह्यांनी शिवानी गोखले ह्यांनी शब्दबद्ध केलेल गीत चिंब ओली देह बोले ह्या गीतांचे सादरीकरण झाले.सादर कार्यक्रमात वैभव दळवी ,शिवानी गोखले आणि वृंदा दाभोळकर ह्यांनी कविता आणि मानवी भावविश्व ह्याची सांगड श्रोत्यांसमोर उलगडून दाखविले. नविन कविता, नविन गाणी आणि नविन गायक प्रेक्षकांपर्यंत पोहोचावेत या साठी धडपडणारे व्रृंदा व कौस्तुभ दाभोलकर ह्या संगीतकार जोडीने अॉडियो व्हिज्युअल पद्घतीने सादर केलेला हा कार्यक्रम रसिकांना आवडला.कॅप्टन वैभव दळवी आणि शिवानी गोखले यांच्या कवितांनी बहार आणली.अभिनय कट्ट्याचे किरण नाकती यांनी सूर व्रृंदावन च्या संपूर्ण संचाचे सन्मानचिन्ह देऊन आभार मानले.

         शब्दांचे अर्थ खूप महत्वाचे असतात.आजकाल गीतातून शब्दांचं महत्व कुठेतरी हरवताना दिसतंय त्यात असा सदाबहार शब्दांचा अर्थ आणि त्याला साजेसे संगीत ह्याचा सुंदर मेळ असलेला सुंदर कार्यक्रम खरच वेगळेपण जपणारा होता.प्रत्येक गीत प्रत्येक कविता आणि त्याचे विश्लेषण खरोखरच सुंदररित्या कार्यक्रमात गुंफलेलं होत असे मत अभिनय कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष किरण नाकती ह्यांनी व्यक्त केले.

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईcultureसांस्कृतिक