शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील स्कूल बसला वाहतूक आचारसंहिता

By admin | Updated: October 26, 2016 05:21 IST

शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक नियंत्रण विभागास तारेवरची कसरत करावी लागत आहे. यात शाळा भरण्याची व सुटण्याच्या वेळी तर शाळेच्या बस वाहतूक

ठाणे : शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक नियंत्रण विभागास तारेवरची कसरत करावी लागत आहे. यात शाळा भरण्याची व सुटण्याच्या वेळी तर शाळेच्या बस वाहतूक विस्कळीत करीत आहेत. यामुळे वाहतूककोंडीला सामारे लावे लागते. यास आळा घालण्यासाठी व या स्कूल बसेसला शिस्त लावण्याकरीता सहा महिन्याच्या कालावधी करीता शहरात या वाहनांच्या पार्किंग करीता वाहतूक विभागाने अधिसूचना जारी केली आहे. ठाणे शहरामध्ये अनेक शाळा व शैक्षणिक संस्था असून त्यात अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. बहुतांश शाळा सकाळ व दुपार च अशा दोन सत्रांमध्ये भरतात. त्या भरण्याची व सुटण्याची वेळ जवळजवळ एकच असल्याने त्यांच्या परिसरात एकाचवेळी वाहतूककोंडी होते. बहुतांश शाळांमध्ये त्यांच्या स्कूल बसेस, व्हॅन पार्किगाकरीता स्वत:ची जागा नसल्याने ही वाहने रस्त्यावरच थांबवून विद्यार्थ्यांची चढउतार करतात. यामुळे रहदारीच्या रस्त्यावर वाहतूककोंडी होत आहे. यातून शालेय मुलांच्या सुरक्षेसदेखील अडचण निर्माण होत आहे. यामुळे संबंधीत रस्त्यांवरून नागरिकांना चालणेदेखील कठीण होत आहे. शाळेच्या बाहेरील परिसरात वाहतूककोंडीच्या वेळी बेदरकार वाहन चालकांमुळे पाल्य तसेच विद्यार्थ्यांनादेखील धोका संभवत आहे. त्यांची सुरक्षा विचारात घेऊन शाळेच्या बाहेरील परिसरातील वाहतूक सुनिश्चित करणे आवश्यक आहे. ज्या शाळांची स्वत:ची वाहन पार्किंगची व्यवस्था आहे, त्यांनी त्यांच्या स्कूल बसेस व व्हॅन रस्त्यावर उभ्या न करता शाळेच्या आवारात उभ्या करु न विद्यार्थ्यांची चढउतार करावी. तसेच पाल्यांची शाळेत ने-आण करणाऱ्या पालकांची खाजगी वाहने देखील शाळेच्या आवारात उभी करावेत.स्वत:ची पार्किग व्यवस्था नसलेल्या शाळांनी त्यांच्या बसेससाठी कोणत्याही परिस्थितीत रस्त्याच्या एकापेक्षा जास्त मार्गीका अडल्या जाणार नसल्याची दक्षता घेण्याचे सुनिश्चित करणे अपेक्षित आहे. याशिवाय शाळेच्या परिसरातील वाहतूक सुनिश्चित ठेवण्यासाठी शाळेने प्रती मीटर अंतरासाठी एका ट्रॉफिक वॉर्डनची नियुक्ती करावी असे देखील अधिसूचनेत नमूद केले आहे. ही अधिसूचना पुढील सहा महिन्याकरीता अंमलात राहणार आहे. यावर हरकतीही मागवण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)