शहरं
Join us  
Trending Stories
1
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
2
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
3
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
4
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
5
विशेष लेख: भगव्या बंगालमध्ये सगळ्यांना ‘भाकरी’ मिळेल का?
6
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
7
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
8
अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
9
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
10
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
11
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
12
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
13
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
14
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
15
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
16
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
17
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
18
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
19
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
20
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बेचिराख होण्यापूर्वी डोंबिवलीला वाचवा

By admin | Updated: June 26, 2016 01:29 IST

प्रदूषणाच्या विळख्यामुळे डोंबिवली घुसमटली आहे. येथील नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. या शहराचे भोपाळ होईपर्यंत वाट पाहू नका. बेचिराख होण्यापूर्वीच डोंबिवलीला वाचवा, अशी

डोंबिवली : प्रदूषणाच्या विळख्यामुळे डोंबिवली घुसमटली आहे. येथील नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. या शहराचे भोपाळ होईपर्यंत वाट पाहू नका. बेचिराख होण्यापूर्वीच डोंबिवलीला वाचवा, अशी आर्त साद नागरिकांच्या आणि विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी लोकप्रतिनिधींना घातली.
‘लोकमत आपल्या दारी’ या उपक्रमानिमित्त ‘डोंबिवलीतील स्फोट... एक महिन्यानंतर’ या विषयावरील चर्चासत्रानिमित्ताने डोंबिवलीच्या बालभवनात झालेल्या चर्चेवेळी शहरातील प्रश्नांवर जोरदार चर्चा झाली. स्फोटाच्या तडाख्यात घरा-दारांचे नुकसान झालेल्यांनी लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारलेच, शिवाय उद्योजकांचे प्रतिनिधी, एमआयडीसीच्या अधिकाऱ्यावरही प्रश्नांची सरबत्ती केली.
स्फोटासारख्या घटनेत झालेले नुकसान भरून देण्यासाठी धोरण ठरविणे, बफर झोन हटवणाऱ्यांवर कारवाई करणे; एमआयडीसी, प्रदूषण मंडळ, कारखानदार, औद्योगिक सुरक्षा विभाग, आरोग्य विभाग, पर्यावरण विभाग, अतिक्रमण हटवण्याची जबाबदारी असलेला विभाग, महापालिका, पोलीस, सरकारी अधिकारी या सर्वांवर जबाबदारी निश्चित व्हायला हवी. सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्या-चौकशा करून भागणार नाही, तर त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी; जो नुकसान करेल तो त्याची भरपाई करेल हे तत्व लागू करायला हवे, असे अनेक मुद्दे मांडण्यात आले. त्या दृष्टीने धोरण ठरवून नवे नियम तयार करण्यासाठी-आधीच्या कायद्यात सुधारणेसाठी लोकप्रतिनिधींनी आग्रह धरण्याची मागणीही करण्यात आली.
हा कार्यक्रम सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टिष्ट्वट करून मृतांच्या नातलगांना मुख्यमंत्री निधीतून प्रत्येकी दोन लाखांची भरपाई देण्याचा निर्णय जाहीर केला. तसेच जखमींवरील उपचाराचा खर्च रूग्णालयांना देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे निधी सुपूर्द केल्याचे त्यांनी सांगितल्याची माहिती आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिली. त्यामुळे नातलगांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.
‘लोकमत’सारखे वर्तमानपत्र, लोकप्रतिनिधी, विविध संस्था, कारखानदारांतील काही जाणत्या व्यक्तींनी या पुढील लढ्यातही पाठीशी राहण्याचे आश्वासन दिल्याने समाधानाचे वातावरण होते. स्फोटात ज्यांच्या घराचे, दुकानाचे नुकसान झाले आहे त्यांना भरपाई देण्याची तरतूद सध्याच्या कायद्यात नाही. त्यासाठी धोरण ठरवण्याचे आश्वासन मिळाल्याने त्या रहिवाशांना, व्यावसायिकांनाही दिलासा मिळाला.