संजय राऊतांना पडताहेत मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने, नितेश राणे यांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2021 19:09 IST2021-11-22T19:08:18+5:302021-11-22T19:09:08+5:30
Nitesh Rane News: शिवसेना नेते संजय राऊत यांना हल्ली मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पडत असल्यामुळे ते रोज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे गोडवे गात असल्याचा टोला भाजप नेते तथा आमदार नितेश राणे यांनी सोमवारी ठाण्यातील पत्रकार परिषदेत लगावला.

संजय राऊतांना पडताहेत मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने, नितेश राणे यांचा टोला
ठाणे : शिवसेना नेते संजय राऊत यांना हल्ली मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पडत असल्यामुळे ते रोज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे गोडवे गात असल्याचा टोला भाजप नेते तथा आमदार नितेश राणे यांनी सोमवारी ठाण्यातील पत्रकार परिषदेत लगावला. मुख्यमंत्री बदलताहेत का, असा खोचक सवाल यावेळी त्यांनी पत्रकारांनाच केला.
मराठा समाजाला आरक्षण खेचून घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले, मराठा समाजाला अंधारात टाकणार नाही. हवे तर पुन्हा गोलमेज परिषद घेतली जाईल. पाटील किंवा देशमुखांच्या मुलांची चिंता नाही; परंतु आघाडी सरकारला खानच्या मुलाची चांगलीच चिंता असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पंतप्रधानांप्रमाणे लोकभावनेची ताकद ओळखावी, अन्यथा सरकार बरखास्त करून निवडणुकांना सामोरे जावे. तेव्हाच महाराष्ट्राच्या काय भावना आहेत ते त्यांना कळेल, असे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राणे म्हणाले.