शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात तीन हजारांहून अधिक वाहनांची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2020 01:24 IST

दिवाळीनिमित्त खरेदी : आरटीओला मिळाला १०.६९ कोटींचा महसूल

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सोन्याचे दागिने आणि वाहन खरेदी करण्याची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यात यंदा १२ ते १६ नोव्हेंबर या चार दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात तीन हजार ५१ वाहनांची विक्री झाली आहे. यामध्ये दुचाकींची संख्या सर्वाधिक असली तरी १०० हून अधिक जड-अवजड मालवाहू वाहनांचीही विक्री झाली आहे. या वाहनविक्रीतून ठाणे, कल्याण आणि नवी मुंबई या तीन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांना सुमारे १० कोटी ६९ लाख ५४ हजार रुपयांचा महसूल मिळाला आहे.

दसऱ्याच्या मुहूर्तापासून तेजीत आलेल्या जिल्ह्यातील वाहनविक्रीच्या व्यवसायात दिवाळीच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी केलेल्या टाळेबंदीमुळे वाहनविक्रीवर मोठा परिणाम झाला होता. ती बंद असल्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या महसुलातही मोठी घट झाली होती. मात्र, टाळेबंदीत शिथिलता आल्यामुळे वाहनविक्रीचा व्यवसायही हळूहळू पूर्वपदावर येऊ लागला आहे. गेल्या महिन्यात दसऱ्याच्या मुहूर्तावर जिल्ह्यात एक हजार ८४ वाहनांची विक्री झाली होती. यातून ठाणे, कल्याण आणि नवी मुंबई या तीन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांना सव्वादोन कोटींचा महसूल मिळाला होता. दिवाळीच्या मुहूर्तावरही या व्यवसायात मोठी वाढ झाली असून १२ ते १६ नोव्हेंबर या चार दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात तीन हजार ५१ वाहनांची विक्री झाली. त्यामध्ये कल्याण उपप्रादेशिक क्षेत्रात सर्वाधिक एक हजार ९१७ वाहनांची विक्री झाली असून कार्यालयाला तीन कोटी ९१ लाख ९३ हजार ९७० रुपयांचा महसूल मिळाला आहे. ठाणे आरटीओ कार्यालयात ६२७ वाहनांच्या विक्रीची नोंदणी झाली असून चार कोटी ६२ लाख ५१ हजार ५६ रुपयांचा महसूल, तसेच नवी मुंबई आरटीओ क्षेत्रातून ५०७ वाहनांची विक्री झाली असून कार्यालयाला दोन कोटी १५ लाख ९ हजार ५६६ रुपयांचा महसूल मिळाला आहे.

सर्वाधिक दुचाकी गाड्यांची विक्रीदिवाळीत विक्री झालेल्या तीन हजार ५१ वाहनांमध्ये सर्वाधिक दोन हजार ३६६ दुचाकी आणि ५१५ चार चाकी वाहनांचा समावेश आहे. तर १०० हून अधिक जड-अवजड मालवाहू वाहनांची विक्री झाली आहे.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस