शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
4
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
5
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
6
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
7
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
8
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
9
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
10
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
12
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
13
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
14
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
15
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
16
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
17
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
18
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
19
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
20
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
Daily Top 2Weekly Top 5

भाडेकपातीला रिक्षाचालकही सहमत

By admin | Updated: October 13, 2016 03:29 IST

डोंबिवली ते उल्हासनगर परिसरात चार सीएनजीपंप सुरू झाल्याने येथील रिक्षांचे भाडे दोन रुपयांनी कमी करण्याचा प्रस्ताव कल्याण आरटीओने परिवहन

डोंबिवली : डोंबिवली ते उल्हासनगर परिसरात चार सीएनजीपंप सुरू झाल्याने येथील रिक्षांचे भाडे दोन रुपयांनी कमी करण्याचा प्रस्ताव कल्याण आरटीओने परिवहन विभागातील वरिष्ठांना पाठवला आहे. या भाडेकपातीला रिक्षाचालक-मालक युनियनच्या पदाधिकाऱ्यांचीही संमती आहे. परंतु, त्यासाठी अगोदर सीएनजीपंपांची संख्या वाढवा आणि नंतर भाडेकपात करा, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.‘रिक्षाप्रवास दोन रुपये स्वस्त’ या शीर्षकाखाली शुक्रवारी ‘लोकमत’च्या हॅलो ठाणेमध्ये बातमी प्रसिद्ध झाली होती. त्यावर, कल्याण-डोंबिवलीतील युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी वरील मत व्यक्त केले. सरकारचा निर्णय मान्यच असेल, पण त्यासाठी सीएनजीपंपांची संख्या वाढवायला हवी. कल्याण-डोंबिवलीत प्रत्येकी एक पंप आहे. तो अपुरा पडत आहे, असे रिक्षाचालक युनियनचे अध्यक्ष दत्ता माळेकर यांनी सांगितले.कल्याणमध्ये शेअर रिक्षाभाड्यात आधीच कपात केली आहे. पुरेसे पंप झाल्यावर हकीम समितीच्या निकषांनुसार भाडेकपात करावी लागल्यास त्याचा सकारात्मक विचार केला जाईल. आधी निर्णय तर होऊ द्या, असे रिक्षा-टॅक्सीचालक-मालक असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी सांगितले. रिपब्लिकन रिक्षा युनियनचे अध्यक्ष रामा काकडे यांनी सीएनजीपंप वाढवावेत, त्यानंतर सरकारच्या निर्णयाबाबत संघटना विचार करेल, असे मत व्यक्त केले. सीएनजी आणि पेट्रोल-डिझेलच्या दरात फरक आहे, हे मान्य आहे. त्यानुसार, आता बहुतांशी रिक्षा सीएनजीवर झाल्या आहेत. पण, त्या प्रमाणात पंप नाहीत. हकीम समितीच्या निकषांच्या आधारे जो निर्णय होईल, तो मान्य असेल, असे डोंबिवलीतील लाल बावटा रिक्षा युनियनचे अध्यक्ष काळू कोमास्कर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)