शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

‘एनआरसी’ कंपनीत पुन्हा टाकला कचरा

By admin | Updated: March 24, 2017 01:03 IST

मालमत्ताकरापोटी ५५ कोटी रुपये थकवल्याप्रकरणी एनआरसी कंपनीच्या आवारात मंगळवारी कचरा टाकण्यात आला होता.

कल्याण : मालमत्ताकरापोटी ५५ कोटी रुपये थकवल्याप्रकरणी एनआरसी कंपनीच्या आवारात मंगळवारी कचरा टाकण्यात आला होता. अशी कारवाई गुरुवारीही करण्यात आली. शहाड येथील मराठे बिल्डर्स यांची मोकळ्या जमिनीवरील मालमत्ताकराची १० लाखांची थकबाकी असल्याने त्यांच्या खुल्या जमिनीवर कचरा टाकण्यात आला. याव्यतिरिक्त एनआरसीच्या जागेतही गुुरुवारी पुन्हा चार मोठ्या गाड्यांद्वारे कचरा टाकण्यात आला. कचरा टाकल्यानंतर महापालिकेकडून तेथे जंतुनाशके व दुर्गंधीनाशक औषधफवारणी केली जात आहे. दरम्यान, आंबिवली येथील नेपच्यून बिल्डर्सचे सेल्स आॅफिस ६ कोटींच्या थकबाकीप्रकरणी सील करण्यात आले.केडीएमसी प्रशासनाच्या कचरा टाक ण्याच्या कारवाईबाबत महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतरही गुरुवारी एनआरसी कंपनी, मराठे बिल्डर्सच्या जागेच्या आवारात कचरा टाकण्यात आला. ही कारवाई ‘अ’ प्रभागाचे अधिकारी सुनील पाटील यांच्या पथकाने केली. ‘जे’ प्रभागाचे अधिकारी प्रकाश ढोले यांनी साडेसहा लाखांच्या थकबाकीपोटी माजी महापौर कल्याणी पाटील यांचे पती नितीन पाटील यांचा ढाबाही सील केला आहे. तर, ‘ब’ प्रभागात केलेल्या कारवाईत प्रभाग क्षेत्र अधिकारी सुहास गुप्ते यांच्या पथकाने पाणीबिलाच्या ४ लाखांच्या थकबाकीप्रकरणी रामबागमधील कडू निवास येथील पाणीजोडणी खंडित केली. १ कोटी ५ लाखांच्या थकबाकीप्रकरणी १७ सदनिका सील केल्या असून ७७ लाख ५१ हजार थकबाकीप्रकरणी व्टेंटीफर्स्ट सेंच्युरी इन्फ्रा लि. यांच्यासह ८६ लाख ३१ हजारांच्या थकबाकीमुळे ह्युम नेटवर्क या मोबाइल टॉवरला जप्तीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ही कारवाई टाळण्याकरिता थकबाकीदारांनी तातडीने थकीत रकमा महापालिका फंडात भराव्यात, असे आवाहन पालिका आयुक्त ई. रवींद्रन यांनी केले आहे. दरम्यान, आतापर्यंत केलेल्या करवसुलीतून २७४ कोटी ७९ लाखांची रक्कम महापालिकेच्या तिजोरीत जमा झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. (प्रतिनिधी)