शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

शरीरविक्रयातून उल्हासनगरात तिघींची मुक्तता : एकास अटक

By admin | Updated: August 15, 2015 22:36 IST

शरीरविक्रयाच्या व्यवसायातून गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने तीन तरुणींची सुटका केली आहे. याप्रकरणी सुनील ऊर्फ रामउजागीर शर्मा (३१) रा. कल्याण

- जितेंद्र कालेकर, ठाणेशरीरविक्रयाच्या व्यवसायातून गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने तीन तरुणींची सुटका केली आहे. याप्रकरणी सुनील ऊर्फ रामउजागीर शर्मा (३१) रा. कल्याण याला अटक केली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. उल्हासनगरच्या स्वर्गद्वार स्मशानभूमीसमोरील सार्वजनिक रस्त्यावर सिद्धार्थ कॉलनी येथे १३ आॅगस्ट रोजी रात्री १०.३० वा.च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. सुनिल हा मसाजचे तंत्रशुद्ध ज्ञान घेतल्यानंतर तो अनेक ठिकाणी मसाजसाठी जात होता. त्याच काळात काही गिऱ्हाइकांनी त्याला अशा प्रकारे त्याने स्त्रिया पुरवाव्यात असे सुचवले. त्यानुसार त्याने परिस्थितीने गरीब असलेल्या मुलींना फूस लावून त्यांना हा व्यवसाय करण्यास भाग पाडले. त्यानुसार, मागणीप्रमाणे तो दोन, तीन कधी पाच हजार रुपये घेऊन गिऱ्हाइकांना या मुली पुरवित असे. गुन्हे अन्वेषण विभागाचे उपायुक्त, सहायक आयुक्त भरत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शकील शेख यांच्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक पी.एस. ठाकूर, उपनिरीक्षक शरद पंजे, कल्याणी पाटील, चंद्रकांत घाडगे आदींच्या पथकाने सापळा लावून त्याला जेरबंद केले. त्याने आधी मोटारसायकलवरून आणलेल्या दोन मुली आणि नंतर आलेली एक अशा तिघींची त्याच्या तावडीतून सुटका केली. व्हॉट्सअ‍ॅपवर या मुलींचे फोटो पाठवून तो संबंधित गिऱ्हाइकांकडे कारने त्यांना घेऊन जायचा. त्याच्याकडून पाच हजारांची रोकड, दोन हजारांचा मोबाइल आणि ५० हजारांची मोटारसायकल असा ऐवज जप्त केला आहे. हिललाइन पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. सुनील याला ठाणे न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.