शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसींचे आरक्षण कमी करा

By admin | Updated: September 21, 2015 03:35 IST

देशामध्ये ओबीसींना २७ टक्के आरक्षण देण्यात आले आहे. या ओबीसी प्रवर्गामध्ये भटके-विमुक्त समाजाच्या ६६६ जातींचा समावेश करण्यात आला आहे

ठाणे : देशामध्ये ओबीसींना २७ टक्के आरक्षण देण्यात आले आहे. या ओबीसी प्रवर्गामध्ये भटके-विमुक्त समाजाच्या ६६६ जातींचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे भटक्या-विमुक्तांना आरक्षणाचा लाभच मिळत नसल्याने ओबीसींचे आरक्षण ७ टक्क्याने कमी करु न ते भटके-विमुक्तांना देण्यात यावे, अशी मागणी भटके-विमुक्त घुमंतु महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ राठोड यांनी केली आहे. दरम्यान, या स्वतंत्र आरक्षणासाठी भटके-विमुक्तांनीही रणशिंग फुंकले असून लवकरच या महासंघाच्या वतीने दिल्लीमध्ये मोर्चा काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ठाण्यात घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. त्यांची नुकतीच भटके-विमुक्त घुमंतु महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या पाशर््वभूमीवर ठाण्यात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आरक्षणासंदर्भातील आपली भूमिका मांडली. देशातील विमुक्त आणि भटक्या समाजाचा ओबीसींमध्ये समाविष्ठ करण्यात आले आहे. मात्र, या ओबीसी समाजातील इतर घटक हुशार आणि पुढारलेले असल्यामुळे त्यांनी या आरक्षणाचा पुरेपुर फायदा घेतला आहे. मात्र, ज्यांना गरज आहे. अशा भटके-विमुक्तांना या आरक्षणाचा काहीही लाभ झालेला नाही. त्यामुळे या समाजाची कोणत्याही प्रकारची प्रगती झालेली नाही. म्हणूनच हे आरक्षण ७ टक्क्याने कमी करण्यात यावे आणि ते भटके विमुक्तांना देण्यात यावे; अशीच शिफारस मंडल आयोगानेही केली होती; या मागणीसाठी येत्या २८ फेब्रुवारी रोजी भटके-विमुक्त घुमंतु महासंघाच्या वतीने नवी दिल्लीतील रामलिला येथे एका महारॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. रेणेके आयोगाने आपल्या अभ्यास अहवालामध्ये केलेल्या चुकांचा आमच्या समाजाला फटका बसला आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी महाराष्ट्राती भटके-विमुक्तांच्या आरक्षणाचे मॉडेल डोळ्यासमोर ठेवावे, अशीही मागणी त्यांनी केली. दरम्यान, हार्दीक पटेल यांच्या आंदोलनासंदर्भात विचारले असता, पटेल याला आरक्षणातील काहीही कळत नसून या देशातील मागास जात प्रवर्गाचे आरक्षण संपविण्याचा हा कट रचण्यात आला आहे. तो कट आम्ही उधळून लावू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.