शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

वारकऱ्यांवरील वार झेलायला तयार; एकनाथ शिंदे यांचं ठाण्यात वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 09:24 IST

उत्सवासाठी देहू, आळंदीहून आलेले ३५० हून अधिक कीर्तनकार, वारकरी शुक्रवारी सहभागी झाले होते.

ठाणे : देश घडवणारा वारकरी संप्रदाय आहे. या वारकऱ्यांवर जर कोणी वार करत असेल तर तो वार झेलायला हा एकनाथ शिंदे पुढे असेल, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी रात्री ठाण्यात केले.

ठाणे पूर्वेतील कोपरीच्या संत तुकाराम महाराज मैदानात शिंदे यांच्या पुढाकाराने धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठान आयोजित श्री अंबे मातेचा चैत्र नवरात्रौत्सव सात एप्रिलपर्यंत सुरू आहे. या उत्सवासाठी देहू, आळंदीहून आलेले ३५० हून अधिक कीर्तनकार, वारकरी शुक्रवारी सहभागी झाले होते.

त्यावेळी शिंदे म्हणाले की, समाजाला दिशा देण्याचे काम वारकरी संप्रदाय करीत असतो. त्यामुळे समाजाला यांची गरज आहे. अलीकडेच पार पडलेल्या निवडणुकीत वारकऱ्यांनी ठरवले आणि करेक्ट कार्यक्रम करून टाकला. ज्याच्या पाठीशी वारकरी तो यशाचे शिखरे पार करतो. मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री म्हणून नाही तर मी एक वारकरी म्हणून उभा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. समाजासाठी काय केले हे सांगणार नाही, तर यापुढे जे जे काही करायचे ते करीतच राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. माझा कष्टकरी वारकरी भयमुक्त झाला पाहिजे. तुम्ही जेव्हा केव्हाही हाक माराल तेव्हा हा एकनाथ शिंदे तुमच्यासाठी धावून येईल, असेही ते म्हणाले.

महायुती सरकारने अडीच वर्षात काय काम केले त्याचे साक्षीदार आपण आहात. असे सांगताना निर्णय कागदावर नाही ठेवले तर त्याची अंमलबजावणी केली. सत्ता येते जाते, पदे येतात-जातात, बाळासाहेब सांगायचे नाव गेले तर ते परत येणार याची आठवण त्यांनी करून दिली.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेthaneठाणे