धावत्या रेल्वेत दरोडा, चाकूच्या धाकावर लुटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2018 23:50 IST2018-08-21T23:49:50+5:302018-08-21T23:50:18+5:30

कसारा येथे एक्स्प्रेस थांबताच दरोडेखोर पसार

Rapid robes robbed of robbery on the knife | धावत्या रेल्वेत दरोडा, चाकूच्या धाकावर लुटले

धावत्या रेल्वेत दरोडा, चाकूच्या धाकावर लुटले

कल्याण : एलटीटी-गोरखपूर कुशीनगर एक्स्प्रेसमधील प्रवाशांना चाकूचा धाक दाखवत ४० हजारांचा मुद्देमाल लुटल्याची घटना रविवारी रात्री घडली. कसारा येथे एक्स्प्रेस थांबताच हे दरोडेखोर पसार झाले. मात्र, प्रवाशांनी केलेल्या आरडाओरडीमुळे एका संशयिताला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.
लोकमान्य टिळक टर्मिनस येथून निघालेली कुशीनगर एक्स्प्रेस रविवारी मध्यरात्री १२ च्या सुमारास कल्याण स्थानकातून सुटली. कल्याण-शहाडदरम्यान एक्स्प्रेसचा वेग कमी होताच चार दरोडेखोर गाडीच्या जनरल डब्यात शिरले. प्रवाशांना त्यांनी चाकूचा धाक दाखवत लुटण्यास सुरुवात केली. कसारा स्थानक येईपर्यंत त्यांनी प्रवाशांकडील मोबाइल, दागिने आणि रोख रक्कम, असा ४० हजारांचा मुद्देमाल हिसकावून घेतला. याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात मालिकराम गुप्ता यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे.
एका आरोपीची चौकशी सुरू असून उर्वरित दरोडेखोरांचा तपास सुरू असल्याची माहिती कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनकर पिंगळे यांनी दिली.

Web Title: Rapid robes robbed of robbery on the knife