बदलापूरमध्ये पुन्हा राडा, शिंदेसेनेच्या नगरसेवकास भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 12:24 IST2026-01-23T12:21:39+5:302026-01-23T12:24:02+5:30

Badlapur Crime News: गेल्या महिन्यात झालेल्या बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुकीपासून शहरात भाजपा आणि शिंदेसेना यांच्यात सुरू असलेला वाद थांबताना दिसत नाही आहे. दोन्ही पक्षांमध्ये सुरू असलेले कुरघोडी आणि फोडाफोडीचे प्रकार आता मारहाणीपर्यंत पोहोचले आहेत.

Rallies again in Badlapur, Shinde Sena corporator beaten up by BJP workers | बदलापूरमध्ये पुन्हा राडा, शिंदेसेनेच्या नगरसेवकास भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण

बदलापूरमध्ये पुन्हा राडा, शिंदेसेनेच्या नगरसेवकास भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण

गेल्या महिन्यात झालेल्या बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुकीपासून शहरात भाजपा आणि शिंदेसेना यांच्यात सुरू असलेला वाद थांबताना दिसत नाही आहे. दोन्ही पक्षांमध्ये सुरू असलेले कुरघोडी आणि फोडाफोडीचे प्रकार आता मारहाणीपर्यंत पोहोचले आहेत. दरम्यान, शिंदेसेनेचे नवनिर्वाचित स्वीकृत नगरसेवक हेमंत चतुरे यांना भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना बदलापूर पश्चिम येथील सोनिवली परिसरात घडली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शिंदेसेनेचे स्वीकृत नगरसेवक हेमंत चतुरे हे माघी गणेशोत्सवानिमित्त आत्मीया हाईट्स येथे दर्शनासाठी आले होते. त्यावेळी हेमंत चतुरे यांच्यावर भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते धावून गेले आणि त्यांना मारहाण केली. या मारहाणीमध्ये हेमंत चतुरे हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मारहाणीच्या या घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं असून, ते आता मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, हेमंत चतुरे यांना भाजपाचे पदाधिकारी तेजस म्हस्कर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप शिंदेसेनेकडून करण्यात आला आहे. नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपाच्या पदाधिकाऱ्याकडून पराभूत झाल्यानंतरही हेमंत चतुरे यांना शिंदेसेनेने स्वीकृत नगरसेवक दिल्याचा राज मनात धरून म्हस्कर यांनी चतुरे यांना मारहाण केल्याचा आरोप शिंदेसेनेचे पदाधिकारी संजय जाधव य़ांनी केला आहे.    

Web Title : बदलापुर: शिंदे सेना पार्षद पर भाजपा कार्यकर्ताओं का हमला, विवाद जारी।

Web Summary : बदलापुर में शिंदे सेना के पार्षद हेमंत चतुरे पर भाजपा कार्यकर्ताओं ने हमला किया। चुनाव के बाद से तनाव जारी है, जिसके चलते सोनीवली इलाके में यह घटना हुई। चतुरे अस्पताल में भर्ती हैं। सीसीटीवी फुटेज सामने आया है। संजय जाधव ने तेजस म्हस्कर पर राजनीतिक द्वेष के कारण हमले का आरोप लगाया।

Web Title : Badlapur: Shinde Sena corporator assaulted by BJP workers amid ongoing feud.

Web Summary : In Badlapur, a Shinde Sena corporator, Hemant Chature, was severely beaten by BJP workers near Sonivali. The assault, stemming from post-election tensions, left Chature hospitalized. CCTV footage has emerged. Sanjay Jadhav alleges Tejas Mhaskar orchestrated the attack due to political resentment.