शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने प्रचारावर विरजण

By admin | Updated: May 14, 2017 22:38 IST

वळवाच्या पावसाने तात्पुरता सुखद दिलासा दिला असला तरी त्याने भिवंडीतील उमेदवारांच्या प्रचाराचे गणित मात्र बिघडवले.

लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : वळवाच्या पावसाने तात्पुरता सुखद दिलासा दिला असला तरी त्याने भिवंडीतील उमेदवारांच्या प्रचाराचे गणित मात्र बिघडवले. अर्ज माघारीनंतर प्रचारासाठी दहा दिवस मिळतील हे गृहीत धरून शुक्रवारपासून घरोघर प्रचाराचे नियोजन उमेदवारांनी केले होते. मात्र वळवाच्या पावसाने ते बिघडवले. बॅनर, झेंडे, भित्तीपत्रके असे साहित्य भिजल्याने ते पुन्हा गोळा करण्याची तयारी त्यांना करावी लागली. त्यातच शनिवारी सकाळीही पाऊस पडल्याने अनेकांच्या प्रचारातील दीड दिवस वाया गेला. रस्त्यांत, पक्ष कार्यालयांच्या आणि उमेदवारांच्या प्रचार कार्यालयांच्या परिसरात पाणी साचून चिखल झाल्याने त्यातून वाट काढणे कठीण बनले. साचलेला कचरा, रस्त्याशेजारी माती भिजून त्यातही चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे अशा स्थितीत प्रचाराला गेल्यावर प्रथम शहराच्या या अवस्थेला उमेदवारांना तोंड द्यावे लागते आहे. त्यामुळे ते हैराण झाले आहेत. पॅनेलसाठी अपक्षांना गळज्या बंडखोरांनी, पक्षाच्या नाराज कार्यकर्त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरले आहेत, त्यांना आतापासूनच गळाला लावण्याचे प्रयत्न वेगवेगळ््या पक्षांनी सुरू केले आहेत. त्यात भाजपा आणि शिवसेना आघाडीवर आहेत. भाजपाचे अधिकृत उमेदवार ५८ असले तरी त्यांचे नेते मात्र ७० जण रिंगणात असल्याचे सांगताना गळाला लावलेल्या अपक्षांचाच आधार घेत आहेत. त्याचपद्धतीने शिवसेनेनेही अशाच सहा ते सात नाराजांशी चर्चा केल्याचे सांगितले जाते. जेथे राजकीय पक्षांना पॅनेलमधील चारही उमेदवार उभे करता आलेले नाहीत, तेथे एका अपक्षाचा आधार घेत चार उमेदवारांचे गणित पूर्ण केले जात आहे. यातून प्रतिस्पर्धी कमी करणे आणि निवडणुकीनंतरच्या गणितांसाठी संख्याबळ वाढवण्याचाही पक्षांचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्र्यांची सभा, आदित्य ठाकरेंचाही रोड शोप्रचाराच्या शेवटच्या आठवड्यात १९ तारखेच्या शुक्रवारपासून नेत्यांच्या सभांची धुळवड रंगेल. त्यासाठी प्रत्येक पक्ष आपल्या दिग्गज नेत्यांना रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहे. भाजपाच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २१ मे रोजी येणार आहेत. पण ते फक्त आपल्याच पक्षाचा प्रचार करतील, अशी माहिती पक्षाच्या नेत्यांनी दिली. कोणार्क आघाडीशी केलेला समझोता अधिकृत मानण्यास नेते तयार नसल्याने मुख्यमंत्र्यांची सभा फक्त भाजपा उमेदवारांसाठी होईल. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सभा घेणार की नाहीत, हे अद्याप ठरलेले नाही. मात्र युवा नेते आदित्य ठाकरे यांचा रोड शो होणार हे स्पष्ट झाले. फक्त त्याची तारीख ठरलेली नाही. काँग्रेसतर्फे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि या निवडणुकीची जबाबदारी असलेले ज्येष्ठ नेते मुजफ्फर हुसेन यांच्या सभा होतील. तर राष्ट्रवादीतर्फे शरद पवार यांनाच आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याखेरीज प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी पालकमंत्री गणेश नाईक, पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या सभा होतील. समाजवादी पक्षातर्फे अबू आझमी हेच प्रचाराची धुरा सांभाळतील.सोशल मीडियाचा आधार : चार वॉर्डांचा एक प्रभाग झाल्याने आणि प्रत्यक्ष प्रचाराचा आठ दिवसांचा काळ हाती असल्याने सोशल मीडियातून प्रचारावर प्रत्येक उमेदवाराचा भर आहे फेसबुकवर प्रचाराच्या क्लिप, फोटो, आधीच्या कामांचा तपशील टाकणे, व्हॉटस अ‍ॅपवरून प्रचार, एसएमएस, व्हॉइस मेसेजवर उमेदवारंचा भर आहे. त्यासाठी प्रचार कार्यालयांतच सोशल मीडिया सेल स्थापन झाले आहेत. तेथूनच प्रचारानंतर लगेचच मजकूर, माहिती, फोटो अपलोड केले जात आहेत. सुट्टीच्या काळात काम मिळाल्याने तरूण मुलेही या कामातून कमाईकडे वळली आहेत. तसेच मतदान केंद्राची माहिती तोंडी सांगण्यापेक्षा काही उमेदवारांनी विविध भागातील मतदारांच्या केंद्रासह माहितीचे बॅनर आपल्या कार्यालयांत लावले आहेत.