शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने दाणादाण

By admin | Updated: September 21, 2015 03:40 IST

जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात शनिवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने दाणादाण उडून जनजीवन विस्कळीत झाले.

ठाणे : जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात शनिवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने दाणादाण उडून जनजीवन विस्कळीत झाले. मुसळधार पावसामुळे लोकल गाड्यांंचे वेळापत्रकही कोलमडल्यामुळे चाकरमान्यांचे हाल झाले. गौरीपूजनासाठी नातेवाइकांकडे जाणाऱ्या प्रवाशांचेदेखील मोठ्या प्रमाणात हाल झाले. या वेळी महिला प्रवाशांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागले. तर, अंबरनाथमध्ये नगरपालिकेच्या शाळेची भिंत कोसळली, तर ठाण्यात पाइपलाइनचा व्हॉल्व्ह नादुरुस्त झाल्याची घटना घडली. तर, शनिवारी मुरबाडनजीकच्या सिंगापूर येथे वादळी पावसात सुमारे पंचवीस ते तीस फूट अंतरावर उडून गंभीर जखमी झालेल्या पांडुरंग वाघ यांचे उपचारादरम्यान रविवारी निधन झाले. तर, इंदिरावाडी येथे एक महिला वाहून गेली आहे.गणेशोत्सवाच्या या कालावधीतील पहिला रविवार सुटीचा असल्यामुळे नातेवाइकांसह मित्रमैत्रिणींकडे गणेशदर्शनासाठी जाणाऱ्यांमध्ये सहकुटुंब सहपरिवार मोठ्या प्रमाणात होते. परंतु, संततधार पावसामुळे त्यांचे हाल झाले. तर, सणासुदीच्या कालावधीत बाजारपेठेत सजलेल्या दुकानांमध्ये पावसामुळे ग्राहकांचा अभाव दिसून आला. रविवारी गौरीचे घराघरांमध्ये भक्तिभावे पूजनही करण्यात आले. या सोहळ्यासह पाच दिवसांचे गणपती सोमवारी जाणार असल्यामुळे त्यांच्या विसर्जनापूर्वीची सत्यनारायण पूजाही बहुतांशी ठिकाणी पार पडली. मात्र, पावसाने त्यात व्यत्यय आल्यामुळे गणेशभक्तांमध्ये काही अंशी नाराजीचा सूर ऐकायला मिळाला. तर, दीर्घकाळापासून विसावा घेतलेल्या पावसाचे पुन्हा आगमन झाल्यामुळे पाणीटंचाईचे संकट दूर होण्याची चाहूल लागल्यामुळे शेतकऱ्यांसह ठाणेकरांनी समाधानही व्यक्त केले.पावसाच्या या कालावधीत ठाणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनचा व्हॉल्व्ह पातलीपाडा परिसरात नादुरुस्त झाल्याची घटना घडली. काही ठिकाणी झाडे कोसळली आहेत. तर, गटारांचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे सतत ये-जा करणाऱ्या गणेशभक्तांचे ठाणे शहरात हाल झाले.