शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

जनसुनावणी रद्द करता येणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 00:52 IST

प्रारूप किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखड्याबाबत बुधवारी आॅनलाइन आणि आॅफलाइन जनसुनावणी ठेवण्यात आली होती

पालघर : प्रारूप किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखड्याच्या जनसुनावणीमध्ये प्रत्यक्ष सहभागी न होता, त्याविरोधात बुधवारी विविध संघटनांनी जनसुनावणी स्थळाबाहेर ठिय्या आंदोलन करून विरोध नोंदवला. या जनसुनावणीविरोधात उच्च न्यायालयात पाच संघटनांनी याचिका दाखल केल्या होत्या. त्यावर बुधवारी सुनावणी होऊ न न्यायालयाने इतर घटकांना म्हणणे मांडण्याचा अधिकार असल्यामुळे ही जनसुनावणी रद्द करता येणार नाही, असे सांगून दंडाधिकाऱ्यांसमोर म्हणणे मांडावे, असे सांगितले. त्यानुसार, या संघटनांच्या प्रतिनिधींनी ही जनसुनावणी बेकायदा असल्याबाबत आपले म्हणणेनोंदवले.

प्रारूप किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखड्याबाबत बुधवारी आॅनलाइन आणि आॅफलाइन जनसुनावणी ठेवण्यात आली होती. आराखडे, नकाशे बनवताना संबंधित ग्रामपंचायती, सहकारी संस्था, सामाजिक संस्था, तलाठी, मंडळ अधिकारी यांना विश्वासात न घेता बनविण्यात आले होते.या नकाशात सीआरझेड लागू असलेली गावे, वाड्या, किनाºयावरील खडकाळ प्रदेश, जैवविविधता स्थळे, तिवरांची झाडे, मच्छीमारांची घरे, मासे सुकवण्याची जागा, बोटी शाकारण्याची जागा, स्थलांतरित पक्ष्यांची जागा इत्यादी बाबींचा नकाशात अंतर्भाव करण्यात आला नसल्याचा आक्षेप उपस्थित विविध संघटनांनी घेतला होता. खासदार राजेंद्र गावितांनी या आशयाचे पत्र आज जिल्हाधिकाऱ्यांना दिले.जनसुनावणीविरोधात नॅशनल फिश वर्कर्स फोरमच्या प्रतिनिधी ज्योती मेहेर, महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे राजन मेहेर, ठाणे जिल्हा मच्छीमार मध्यवर्ती संघाचे अध्यक्ष जयकुमार भाय, ठाणे जिल्हा मच्छीमार समाज संघाचे अध्यक्ष रामकृष्ण तांडेल आणि वाढवणविरोधी संघर्षसमितीचे अध्यक्ष नारायण पाटील या पाच याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.आंदोलकांचे आक्षेपआराखड्यांचे नकाशे बनवणाºया कंपनीचे पदाधिकारी उपस्थित नाहीत, जनसुनावणी पुढे ढकलण्याचे अधिकार जिल्हाधिकाºयांना नाहीत आणि जनसुनावणीची लिंक तीन दिवसांपूर्वी तर आॅफलाइन प्रक्रि या दोन दिवसांपूर्वी दिल्याने ही प्रक्रि या कायदेशीर असल्याचे जिल्हाधिकाºयांनी स्पष्ट करावे, या मागणीवर उत्तर न मिळाल्याने आंदोलकांनी आपले आंदोलन उशिरापर्यंत सुरूच ठेवले.

टॅग्स :thaneठाणेpalgharपालघर