शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
4
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
5
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
6
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
7
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
8
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
9
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
10
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
11
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
12
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
13
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
14
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
15
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
16
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
17
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
18
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
19
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
20
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

भरमसाट फी वसूल करणाऱ्या शैक्षणिक संस्थांवर मालमत्ता कराची खैरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2018 21:10 IST

मीरा-भार्इंदर शहरातील सर्व खासगी शाळा, महाविद्यालये व तंत्रशिक्षण संस्था चालविणाऱ्या शैक्षणिक संस्थांना मालमत्ता करात तब्बल ५० टक्के सवलतीच्या प्रस्तावाला सत्ताधारी भाजपाने बहुमताने मान्यता दिल्याने भरमसाट फी वसूल करणाऱ्या शैक्षणिक संस्थांना चांगलाच दिलासा तर करवाढ करून सामान्य नागरिकांच्या डोक्यावरील आर्थिक भार वाढविल्याचा आरोप विरोधकांकडून होऊ लागला आहे.

भार्इंदर - मीरा-भार्इंदर शहरातील सर्व खासगी शाळा, महाविद्यालये व तंत्रशिक्षण संस्था चालविणाऱ्या शैक्षणिक संस्थांना मालमत्ता करात तब्बल ५० टक्के सवलतीच्या प्रस्तावाला सत्ताधारी भाजपाने बहुमताने मान्यता दिल्याने भरमसाट फी वसूल करणाऱ्या शैक्षणिक संस्थांना चांगलाच दिलासा तर करवाढ करून सामान्य नागरिकांच्या डोक्यावरील आर्थिक भार वाढविल्याचा आरोप विरोधकांकडून होऊ लागला आहे.शहरामध्ये २९० खासगी शाळा, सुमारे ५० कनिष्ठ व पदवी महाविद्यालये व सुमारे १० तंत्रशिक्षण संस्था अस्तित्वात आहेत. त्यांच्याकडून सोईनुसार फी वाढ करून पालकांना वेठीस धरले जाते. राज्य सरकारच्या आदेशानुसार प्रत्येकी २ वर्षांनी खासगी शाळांना १५ टक्के फी वाढ करण्याचा अधिकार असला तरी त्यासाठी विभागीय फी नियंत्रण प्राधिकरणाची मान्यता आवश्यक करण्यात आली आहे. तत्पूर्वी त्या फी वाढीला पालकवर्गाची मान्यता देखील अत्यावश्यक करण्यात आली आहे.मात्र काही शाळा सरकारी नियम डावलून महागाई वाढल्याचे कारण पुढे करीत भरमसाठी फी वाढ करीत आहेत. केंद्र सरकारच्या बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण हक्क कायदा २००९ नुसार इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण मोफत देण्याचे निर्देश असतानाही त्याला बगल दिली जात आहे. पालिकेकडुन १ ली ते ८ वी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण मोफत दिले जात असुन त्यापुढील शिक्षण पालिकेतील विद्यार्थ्यांसह गरीब व गरजू विद्यार्थ्यांना खाजगी शाळेत मोफत मिळावे, यासाठी नगरपरिषदेच्या काळात भोगवटाधारक इमारतींतील शाळांना ५० टक्के मालमत्ता करासह पाणीपट्टीत सवलत देण्याचा ठराव मंजुर करण्यात आला.याखेरीज हा दर व्यावसायिकऐवजी निवासी दराने वसूल करण्यात यावा, असा फतवा देखील काढण्यात आला. सवलतीची खैरात लाटणाऱ्या खाजगी शाळांनी आत्तापर्यंत किती गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले वा देत आहे, हा सध्या संशोधनाचा विषय ठरत आहे. मात्र पालिका अधिनियमात शैक्षणिक संस्थांना करात सवलत देण्याची तरतूद नसल्याचे कायदेतज्ञांकडुन सांगण्यात येत असतानाही तत्कालिन महासभेत मंजुर ठरावानुसार केवळ राजकीय मर्जीतील भोगवटा इमारतींतील खाजगी शाळांनाच सवलत देण्यात आली. तर भोगवटाधारक इमारतीत केवळ मर्जीतील नसल्याने काही शाळांना या सवलतीपासून वंचित ठेवण्यात आले. अशा शाळांना हि सवलत लागू करण्याचा ठराव तीन वर्षांपुर्वीच्या महासभेत मंजुर करण्यात आला असला तरी अद्याप त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यामुळे या शाळांकडुन व्यावसायिक दराने १०० टक्के कर वसुली करण्यात येते. सध्या सवलत प्राप्त शाळांना प्रती चौरस फुटामागे १ रुपया ६० पैसे निवासी दराऐवजी ८० पैसेच कर भरावा लागत असुन त्यांची संख्या सुमारे ५० इतकी असल्याचे सांगितले जात आहे.तर २० फेब्रुवारीच्या महासभेत मालमत्ता कराच्या कक्षेत न आलेल्या मालमत्तांना १ एप्रिलपासून २ रुपये ४० पैसे प्रती चौरस फूट दर मोजावा लागणार आहे. या नवीन दराच्या ५० टक्के करच सवलत प्राप्त होणा-या खाजगी शाळांना भरावा लागणार आहे. एकाच कराची वेगवेगळ्या दराने वसुली होणार असल्याने भविष्यात हा वादाचा मुद्दा ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत. एका बाजुला भरमसाठी फी वसूल करणाऱ्या शैक्षणिक संस्थांना करात ५० टक्के सवलत देऊन पालिकेच्या तिजोरीचा भार कमी करून सत्ताधारी भाजपा शिक्षण सम्राटांच्या तिजोरीत भर टाकणार असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. खाजगी शाळांना करात सवलत देण्यात येत असेल तर फीमध्ये सुद्धा कपात करुन पालकाच्या डोक्यावरील आर्थिक भारही सत्ताधारी व पालिकेने कमी करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक