शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

तूरडाळ कडाडल्याने हॉटेल्समधील मेन्यू महागले

By admin | Updated: November 10, 2015 00:09 IST

महाग झालेल्या तूरडाळीवरून बरेच राजकारण झाले. तरीही त्याचे भाव काही उतरले नाहीत. त्यातच आता डाळ कडाडल्याने हॉटेलमधील डिशेसच्या दरातही दहा टक्के दरवाढ झाली आहे

जान्हवी मोर्ये,  ठाणेठाणे : महाग झालेल्या तूरडाळीवरून बरेच राजकारण झाले. तरीही त्याचे भाव काही उतरले नाहीत. त्यातच आता डाळ कडाडल्याने हॉटेलमधील डिशेसच्या दरातही दहा टक्के दरवाढ झाली आहे. त्यामुळे घराबाहेर रिफ्रेंशमेंट घेणाऱ्यांच्या खिशाला फटका बसणार आहे.मुंबई परिसरात ७ हजार हॉटेल्स आहेत. या हॉटेल्स संघटनेचे जनरलसेक्रेटरी सुकेश शेट्टी यांच्याकडे दरवाढीविषयी विचारणा केली असतात्यांनी आठ ते दहा टक्के दरवाढ झाल्याचे मान्य केले. त्यासाठी त्यांनी तूरडाळीच्या भाववाढ कारणीभूत झाल्याचे सांगितले. डाळीचे भाव कमी झाल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात डाळ २०० रूपयांना बाजारात विकली जात आहे. तूरडाळच महाग झाली नसून इतर डाळींचे भावही वाढले आहे. मेंदूवडा, बटाटा वडा, सांबारमध्ये डाळ टाकली जाते. दालफ्राय आणि साधे वरण राईससोबत दिले जाते. यासाठीच नाईलास्तव दरवाढ करावी लागली आहे. तूरडाळीपूर्वी कांद्याच्या दरवाढीने रडविले होते. त्यावेळी दरवाढ केलेली नव्हती. मात्र, आता हा दरवाढीचा निर्णय घेतला आहे. ठाणे शहरात जवळपास हजार हॉटेल्स आहेत. हॉटेल्स संघटनेचे अध्यक्ष साई प्रसाद शेट्टी यांनी सांगितले की, एका ठराविक दराच्या खाली आम्ही कोणताही पदार्थ विकत नाही. तसेच दरवाढही कमी जास्त असू शकते. कुठे आठ टक्के तर कुठे दहा टक्के आहे. हॉटेलचा पसारा किती कमी अथवा जास्त आहे, तेथे येणाऱ्या ग्राहकाचा दर्जा पाहून दर ठरविले जातात. एखादे हॉटेल गार्डन रेस्टॉरंट असते. एखाद्या ठिकाणी २०० ग्राहक एकाचवेळी बसून जेवण नाश्ता करु शकतात. काही हॉटेल्समध्ये शाकाहारी तर काही ठिकाणी मांसाहारी असा बेत असतो. तर काही छोटे हॉटेल्स लोअर मिडल क्लासचा ग्राहक विचारात घेऊन आपले दर ठरवितात. ग्राहकांना आपल्याशी बांधून ठेवता यावे यासाठी काहीजण कमी दर आकारतात.