शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर करण्याच्या रोड मॅपसाठी जिल्हाधिकार्यांकडून पूर्व तयारी आढावा

By सुरेश लोखंडे | Updated: September 3, 2024 22:22 IST

ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष आढावा बैठक आज पार पडली.

सुरेश लोखंडे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे :  मुंबई महानगर क्षेत्राची अर्थव्यवस्था सन २०३० पर्यंत एक ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचवण्यासाठी रोड मँप तयार करण्यात येत आहे. यामध्ये मुंबई महानगर क्षेत्रामध्ये सर्वांसाठी घरे, आर्टिफिशीयल इंटेलिजेन्स आणि हायटेक आयटी पार्क, पर्यावरण पूरक विकास,  इंडस्ट्रिज ४.० च्या अनुषंगाने सेमी कंडक्टर आणि सोलर सेल मॅन्युफॅक्चरिंग, वाढवण बंदर विकास आदींचा समावेश आहे. यासाठी १२ ते १५ सप्टेंबर या कालावधीत ठाणे जिल्ह्यात कार्यशाळा आयोजित होणार आहे. याच्या पूर्व तयारीसाठी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष आढावा बैठक आज पार पडली.          पर्यावरण पूरक विकास म्हणजे ग्रीन हायड्रोजन, सांडपाणी व्यवस्थापन, सौरउर्जा, सार्वजनिक परिवहन व्यवस्थेचा अधिकाधिक विकास धोरण ठरवण्यात येत आहे. त्यासाठी मुंबई महानगर क्षेत्र विकास धोरण विकास २०३० साठी या कारयशाळेचे आयोजन करण्यात येत आहे.  या कार्यक्रमाची पूर्व तयारी आढावा बैठक आज येथील समिती सभागृहात आज पार पडली. या बैठकीत महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशन (मित्र) संस्थेचे उपाध्यक्ष सुशिल खोडवेकर, ठाणे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, उद्योग विभागाच्या सहसंचालक विजू शिरसाठ, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रशांत रोडे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. या कार्यशाळेच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या अनुभवाचा महानगर क्षेत्रातील विकास धोरणाच्या जडणघडणीत महत्त्वाचा हातभार लागणार आहे, असा विश्वास जिल्हाधिकार्यांनी यावेळी व्यक्त केला.

टॅग्स :thaneठाणे