Video : खड्ड्याने घेतला दुचाकीस्वाराचा जीव; ठाण्यात झालेल्या अपघातात युवकाचा मृत्यू

By Rishi Darda | Published: September 24, 2021 04:58 PM2021-09-24T16:58:42+5:302021-09-24T17:01:59+5:30

Youth dies due to Pothole : MH 04 GY2564 Bajaj Pulsar-220 या दुचाकीचा ठाण्यातील घोडबंदर रोडवरील गायमुख नाका येथे खड्डयामुळे अपघात झाला.

The pit took the life of two wheeler driver; Youth dies in Thane accident | Video : खड्ड्याने घेतला दुचाकीस्वाराचा जीव; ठाण्यात झालेल्या अपघातात युवकाचा मृत्यू

Video : खड्ड्याने घेतला दुचाकीस्वाराचा जीव; ठाण्यात झालेल्या अपघातात युवकाचा मृत्यू

Next
ठळक मुद्देया मृत दुचाकीस्वाराचं नाव मोहम्मद फैजल अल्हाबक्स बाडवाले असं आहे. या व्यक्तीला उपचाराकरीता रूग्णवाहीकेतून जिल्हा शासकीय रुग्णालय, ठाणे येथे दाखल केले असता त्यास मृत घोषीत करण्यात आले.

२१ सप्टेंबरला दुपारी २.३० वाजताच्या सुमारास ठाण्यातील गायमुख जकात नाका येथील घोडबंदरकडून ठाण्याकडे येणारा रोडवर खड्ड्यामुळे एका दुचाकीस्वाराचा अपघात झाला होता. दुर्दैवाने रुग्णालयात दाखल केल्यांनतर दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. या मृत दुचाकीस्वाराचं नाव मोहम्मद फैजल अल्हाबक्स बाडवाले असं आहे. 

MH 04 GY2564 Bajaj Pulsar-220 या दुचाकीचा ठाण्यातील घोडबंदर रोडवरील गायमुख नाका येथे खड्डयामुळे अपघात झाला. ही दुचाकी रशीद जलील अहमद शेख यांच्या मालकीची असून मोहम्मद फैजल अल्हाबक्स बाडवाले या २३ वर्षीय तरुण बजाज पल्सर दुचाकी चालवत होता. त्यावेळी  या दुचाकीचा रोडवरील खड्यामुळे बाडवालेचा पडून अपघात झाला. या अपघातात दुचाकी चालकच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली होती. घटनास्थळी कासारवडवली पोलीस कर्मचारी रूग्णवाहीकेसह उपस्थित होते. या व्यक्तीला उपचाराकरीता रूग्णवाहीकेतून जिल्हा शासकीय रुग्णालय, ठाणे येथे दाखल केले असता त्यास मृत घोषीत करण्यात आले. मृत दुचाकीस्वार हा मुंब्रा येथील अमृत नगर परिसरातील वुडसिझा येथे राहणारा होता. 

 

Read in English

Web Title: The pit took the life of two wheeler driver; Youth dies in Thane accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app