शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथमध्ये सामाजिक विषयांवरील चित्ररथांना दाद

By admin | Updated: March 29, 2017 05:39 IST

पारंपारिक वेशातील महिला आणि पुरूष, सोबत विविध सामाजिक विषयावरील आकर्षक चित्ररथ, महिलांची बाईकरॅली

अंबरनाथ : पारंपारिक वेशातील महिला आणि पुरूष, सोबत विविध सामाजिक विषयावरील आकर्षक चित्ररथ, महिलांची बाईकरॅली आणि ढोल-ताशांच्या गजरात नववर्षाचे स्वागत करण्याकरिता रस्त्यावर उतरलेली तरुणाई यामुळे स्वागतयात्रेचा उत्साह यंदाही अनुभवास आला. वडवली येथील ब्राह्मण सभेला यंदाच्या यात्रेचे यजमानपद मिळाले होते. श्री गजानन महाराज सेवा मंडळाच्या सहचिटणीस संध्या म्हात्रे, सुयोग महिला मंडळाच्या अध्यक्षा अनिता डिक्रूस, माधुरी आठवले, उज्ज्वला कबरे, पूर्णिमा जावळे यांच्यासह माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांच्या उपस्थितीत महिलांच्या बाईक रॅलीला शिवाजी चौकातून प्रारंभ झाला. नऊवारी साड्या परिधान करून बाईक रॅलीमध्ये महिला सहभागी झाल्या होत्या. खेर विभागातील हेरंब मंदिरात उपयात्रा सहभागी झाल्यानंतर यात्रेला सरुवात झाली. धार्मिक तसेच शैक्षणिक, सामाजिक संस्थांचे चित्ररथ यात सहभागी झाले. ‘पाणी वाचवा’, ‘बेटी बचाओ’, ‘निसर्गाचे संतुलन राखा’, अशा सामाजिक विषयावर चित्ररथ तयार केले. शिवाजी चौकात आ. डॉ. बालाजी किणीकर , नगराध्यक्षा प्रज्ञा बनसोडे, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी स्वागतयात्रा समितीच्यावतीने छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून यात्रा हुतात्मा चौकाकडे गेली. (प्रतिनिधी)बदलापूरमध्ये ढोल-ताशांच्या गजरात पारंपारिक सोहळा महिलांच्या ढोल पथकांचा गजर, जोडीला ध्वजपथकांची साथ, शंखनाद, त्याला लहानमुलांच्या लेझीमची जोड, पैठणीतील महिला बाईकस्वार, विविध विषयांवरील सामाजिक संदेश देणारे चित्ररथ यामुळे बदलापूरच्या स्वागतयात्रेतही उत्साहाचे वातावरण होते. नववर्ष स्वागतयात्रा समिती आणि हनुमान मारूती देवस्थान यांच्या वतीने यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. बदलापूर पश्चिमेकडील दत्त चौकतून ही शोभायात्रा निघाली. ही स्वागतयात्रा गणेशचौक, मोहनानंद नगरमार्गे रेल्वे स्थानक परिसरात पोहोचली. कात्रप आणि शिरगावमधून येणाऱ्या उपयात्रा मुख्य यात्रेत सहभागी झाल्या. यावेळी शिरगावच्या ‘मर्दानी’या महिलांच्या ढोलपथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्याच पथकातील तलवार पथक, ध्वजपथक आणि गुढी घेतलेल्या पथकांचे संचलन हे शोभायात्रेचे आकर्षण ठरले.बदलापूरच्या ‘मार्तंड’ ढोलपथकानेही यात्रेची शोभा वाढवली. ‘इंधन वाचवा’ हा संदेश देणारे साईश्याम देवस्थान येथील चित्ररथाने सगळ््यांचे लक्ष वेधून घेतले. सत्कर्म बालकाश्रमही यात्रेत सहभागी झाला होता.