शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी वसई मार्गावरील ट्रेन उशिरा येत असल्याने प्रवासी संतप्त

By नितीन काळेल | Updated: August 30, 2022 15:35 IST

भिवंडीकरांना वाहतूक कोंडीचा नेहमीच त्रास होत असतो. या वाहतूक कोंडीच्या त्रासातून भिवंडीकरांची सुटका करण्याचे काम भिवंडी वसई या मध्य व पश्चिम रेल्वे मार्गाला जोडणाऱ्या मार्गीकेतून होत असते.

भिवंडी:दि.३०-

भिवंडीकरांना वाहतूक कोंडीचा नेहमीच त्रास होत असतो. या वाहतूक कोंडीच्या त्रासातून भिवंडीकरांची सुटका करण्याचे काम भिवंडी वसई या मध्य व पश्चिम रेल्वे मार्गाला जोडणाऱ्या मार्गीकेतून होत असते. मात्र सध्या भिवंडी वसई मार्गावर येजा करणाऱ्या डोंबिवली बोईसर या लोकल ट्रेनला रोज उशीर होत असल्याने प्रवासी संतप्त झाले आहेत.

मध्य व रेल्वे मार्गाला जोडण्यासाठी पनवेल ते बोईसर असा रेल्वे मार्ग रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात आला असून या मार्गावर मालवाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याचबरोबर भिवंडी रोड रेल्वे स्टेशन हे मालवाहतूकीचे मुख्य केंद्र बनल्याने या मार्गावर मालगाड्या मोठ्या प्रमाणात ये जा करत असतात. तर प्रवाशांच्या सोयीसाठी या मार्गावर अवघ्या आठ रेल्वे गाड्या वेळा वेळाने सोडण्यात येत असतात. या मार्गावरून जाणारी डोंबिवली बोईसर ही ट्रेन सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी भिवंडी रोड रेल्वे स्थानकावर येत असते मात्र मंगळवारी हि ट्रेन तब्बल ४० मिनिटे उशिराने भिवंडी रोड रेल्वे स्थानकांवर पोहोचली.त्यामुळे या ट्रेनवर अवलंबून असणाऱ्या अनेक चाकरमान्यांसह विदयार्थी व प्रवाशांचे मोठे हाल झाले. विशेष म्हणजे ही ट्रेन उशिराने येऊनही या मार्गावरील कामन रोड रेल्वे स्थानकावर तब्बल एक ते दीड तास थांबली.त्यामुळे प्रवाशांची मोठी कोंडी झाली होती.याठिकाणी प्रवाशांनी देखील काही काळ ट्रेन रोखून धरली होती.त्यामुळे या ठिकाणी कबी काळ तानावाचे वातावरण निर्माण झाले होते.या ट्रेनला रोजच्या होणाऱ्या उशिरामुळे विद्यार्थी व प्रवाशांना मोठा त्रास होत असून मालगाड्या जाण्यासाठी स्टेशन यंत्रणा प्रवासी रेल्वे ट्रेन ला रोखून धरले जात असल्याचा आरोप प्रवाशांकडून केला जात आहे.यासंदर्भात भिवंडी रोड रेल्वे स्थानकाशी संपर्क केला असता कधी कधी ट्रेनला उशीर होत असतो मात्र त्याचे नेमकी कारण वरिष्ठ अधिकारी सांगू शकतील अशी माहिती येथील कर्मचाऱ्यांनी दिली आहे.त्यामुळे या मार्गावरील लोकल फेऱ्यांच्या नियोजित वेळेकडे आतातरी रेल्वे प्रशासन लक्ष देणार का असा सवाल प्रवासी करत आहेत.

टॅग्स :bhiwandiभिवंडी