शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

फीवाढीविरोधात पालकांचे उपोषण

By admin | Updated: May 16, 2017 00:06 IST

येथील रोटरी स्कूलने सिनिअर केजीच्या प्रवेशासाठी केलेली फीवाढ ही अन्यायकारक असल्याचा आरोप करत या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी

लोकमत न्यूज नेटवर्कअंबरनाथ : येथील रोटरी स्कूलने सिनिअर केजीच्या प्रवेशासाठी केलेली फीवाढ ही अन्यायकारक असल्याचा आरोप करत या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या पालकांच्या बाजूने मनसेचे माजी नगरसेवक कुणाल भोईर यांनी पुढाकार घेतला होता.रोटरी स्कूलच्या समितीने निर्णय घेत सिनिअर केजीच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी १७ हजारांवरून थेट २५ हजार इतकी फी केली. आठ हजारांची ही फीवाढ पालकांना अन्यायकारक वाटल्याने त्यांनी मनसेच्या नेतृत्वाखाली शाळेच्या मुख्याध्यापिकांची भेट घेऊन फी कमी करण्याची मागणी केली. फी कमी न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. शाळा प्रशासनाने यासंदर्भात बैठक घेऊन ही फी २५ हजारांवरून २३ हजारांवर आणली. मात्र, तरीही पालकांचे समाधान न झाल्याने त्यांनी सोमवारपासून विद्यार्थ्यांसह उपोषणाला सुरुवात केली. उपोषणानंतर पोलिसांनी याप्रश्नी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, या वेळी झालेल्या बैठकीतदेखील ही फी २२ हजार करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, तरीदेखील पालकांनी फी आणखी कमी करण्याची मागणी करत आंदोलन सुरूच ठेवले आहे. दुसरीकडे अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील अनेक शाळांनी मनमानी पद्धतीने फी वाढ केलेली आहे. मात्र, त्या शाळेतील पालकांनी अद्याप कोणतीच तक्रार केलेली नाही. या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता जगदाळे यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, शाळेची फीवाढ ही नियमानुसार करण्यात आलेली आहे. त्यात फेरबदल करण्याचे सर्व अधिकार शाळेच्या संचालकांना आहे. फीसंदर्भात निर्णय घेण्यासाठी बैठकीचा मार्ग अवलंबणे गरजेचे आहे. सिनिअर केजीच्या विद्यार्थ्यांना आंदोलनात सामील केल्यास त्याचा परिणाम हा विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर होऊ शकतो. विषय हे चर्चेनेच सुटावे, ही आमची अपेक्षा आहे, असे त्या म्हणाल्या. शाळेचे संचालक संजय पानसे यांना विचारले असता समितीने यासंदर्भात निर्णय घेतलेला आहे. पालकांसोबत आम्ही पुन्हा चर्चा करण्यास तयार आहोत. आंदोलनापेक्षा चर्चेने विषय लवकर सुटतील. शाळेत सुविधा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आल्या आहेत. त्यामुळे फी वाढ करणे गरजेचे होते. सुविधांसाठी फीवाढ केलीशाळेचे संचालक संजय पानसे यांना विचारले असता समितीने यासंदर्भात निर्णय घेतलेला आहे. पालकांसोबत आम्ही पुन्हा चर्चा करण्यास तयार आहोत. आंदोलनापेक्षा चर्चेने विषय लवकर सुटतील. शाळेत सुविधा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आल्या आहेत. त्यामुळे फी वाढ करणे गरजेचे होते. अंबरनाथ, बदलापूरमधील अन्य शांळांनीही फीवाढ केल्याने तेथील पालकांनीही संताप व्यक्त केला आहे. अंबरनाथमधील फादर अ‍ॅग्नेल, बदलापूरमधील कार्मिल हायस्कूल, डॉन बॉस्को अशा शाळांचा फीवाढीमध्ये समावेश आहे. येथील फीवाढ कमी न झाल्यास पालकांना आंदोलनाचे हत्यार उपसावे लागेल असा इशारा दिला आहे.