शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

विरोधी पक्षनेता व शिवसेना सदस्यात जुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 01:23 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेची महासभा : जातीवाचक शब्दोल्लेख वगळल्यानंतर प्रकरण निवळले

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महासभेत गुरुवारी शिवसेना सदस्य मल्लेश शेट्टी यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते राहुल दामले यांना उद्देशून जातीवाचक शब्दाचा वापर केला. त्यामुळे सभेत शेट्टी विरुद्ध दामले यांच्यात चांगलीच जुंंपली. अखेरीस, जातीवाचक शब्दोल्लेख महासभेच्या कामकाजातून वगळण्यात यावेत, असे आदेश महापौर विनीता राणे यांनी दिल्यावर प्रकरण निवळले.

महासभेच्या पटलावर कार्यकारी अभियंते चंद्रकांत कोलते व सुनील जोशी यांना पदोन्नती देण्याचा प्रस्ताव चर्चेसाठी आला असता, शेट्टी यांनी दोघांविरोधात काही गुन्हे दाखल आहेत का, असा सवाल केला. त्यावेळी उपायुक्त मारुती खोडके यांनी कोलते यांच्याविरोधात गुन्हा दाखल नाही. मात्र, जोशी यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे चौकशी सुरू आहे, अशी माहिती दिली. त्यावर शेट्टी यांनी जोशी यांच्या प्रस्तावाला मान्यता देऊ नये. कोलते यांच्या प्रस्तावाला मान्यता देण्यास माझी हरकत नाही, असे सांगितले. यावेळी दामले म्हणाले, निवृत्त शहर अभियंते प्रमोद कुलकर्णी यांच्याही पदाला मान्यता देण्याचा विषय प्रलंबित आहे. त्यावर शेट्टी यांनी कुलकर्णी हे महापालिका सेवेतून निवृत्त झाले आहे. त्यांचा प्रश्न का उपस्थित केला जात आहे. मात्र, दामले त्यांच्या मुद्यावर आग्रही राहिले. त्यामुळे शेट्टी यांनी आरोप केला की, जोशी व कुलकर्णी हे एका विशिष्ट जातीचे असल्याने त्यांचा मुद्दा तुम्ही लावून धरला आहे. त्यावर दामले यांनी शेट्टी हे जातीवाचक बोलत आहेत. त्यांनी त्यांचे शब्द मागे घ्यावेत. मात्र, शेट्टी यांनी मी शब्द मागे घेणार नाही, असा पवित्रा घेत दामले यांच्यावर संतप्त झाले. यावेळी भाजपचे गटनेते शैलेश धात्रक यांनी दामले यांना समजावण्याचा प्रयत्न केला. तर, शिवसेना सदस्य दीपेश म्हात्रे यांनी शेट्टी यांना आवरण्याचा प्रयत्न केला.अपक्ष नगरसेवकाचा संतापच्महापालिकेत शिवसेनेला समर्थन देणारे अपक्ष नगरसेवक कासिफ तानकी यांनी त्यांची सभा तहकुबी चर्चेला घ्यावी. मला बोलू द्यावे, अशी आग्रही मागणी केली. मात्र, सचिव संजय जाधव यांनी मागच्या वेळेस तहकूब केलेली सभा आज सुरू आहे. विषयपत्रिकेस सुरुवात झाली आहे. त्यामुळे हा विषय मांडता येणार नाही. मात्र, या मुद्यावर आग्रही असलेल्या तानकी यांनी थेट महापौरांच्या दिशेने धाव घेतली. ते व्यासपीठावर पोहोचले. त्यावेळी महापौरांनी सुरक्षारक्षकांना पाचारण केले. सुरक्षारक्षक व तानकी यांच्यात झटापट होऊन शोभा होणार, असा अंदाज येताच ज्येष्ठ सदस्यांनी तानकी यांची समजूत काढून त्यांना खाली बसविले. यावेळी तानकी यांची सभागृह नेते प्रकाश पेणकर व शिवसेना सदस्य विश्वनाथ राणे यांच्यासोबत शाब्दिक चकमक झाली.सभेनंतर घेतली दोघांनी गळाभेटमहासभेचे कामकाज संपल्यावर दामले व शेट्टी यांना प्रतिक्रियेसाठी पत्रकारांनी गाठले असता त्यांनी असा कोणत्याही प्रकारचा वादच झालेला नाही, असे सांगत एकमेकांची गळाभेट घेत या विषयावर पांघरूण टाकले. 

टॅग्स :thaneठाणे