शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

प्रभागात केवळ चिखलाचा रस्ता

By admin | Updated: January 18, 2016 01:46 IST

डहाणू नगरपरिषद क्षेत्रातील सरावली शिवाजीनगरमधील नागरी समस्यांकडे नगरपरिषदेचे कायम दुर्लक्ष झाले आहे. या प्रभागाकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने रहिवाशांना चिखल तुडवत

शौकत शेख,  डहाणूडहाणू नगरपरिषद क्षेत्रातील सरावली शिवाजीनगरमधील नागरी समस्यांकडे नगरपरिषदेचे कायम दुर्लक्ष झाले आहे. या प्रभागाकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने रहिवाशांना चिखल तुडवत घर गाठावे लागत आहे. शिवाजीनगर येथे जिल्हापरिषदेची प्राथमिक शाळा आहे. मात्र, या शाळेकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने विद्यार्थ्यांनाही चिखलातून शाळेत यावे लागत आहे. रस्ताच नसल्याने गटारेही अस्तित्वात नाहीत. त्यामुळे या भागात ठिकठिकाणी पाणी साचून डपक्यांना गटाराचे स्वरूप प्राप्त झालेले आहे.रस्त्याबरोबरच वीज आणि पाणी या समस्यांची रहिवाशांनी सवयच लावून घेतली आहे. शिवाजीनगर डहाणू-चारोटी मार्गाला जोडूनच आहे. या ठिकाणी नागरी वस्ती वाढत आहे. त्यामुळे वाहनांचीही कायम वर्दळ असते. शिवाजीनगर येथे लोकवस्ती वाढू लागल्याने पादचाऱ्यांची संख्याही मोठी असते. पावसाळ्यात या प्रभागात जाण्यासाठी रस्त्याच नसल्याने अर्धा किमी अंतर नाइलाजास्तव सक्तीने चिखल तुडवत जावे लागत आहे. खाजणचा भागही याच प्रभागाला लागून आहे. हा भाग सखल असल्यामुळे भरतीचे पाणी परिसरात याच भागात तुंबते. मुख्य रस्त्यापासून फुगा कंपनीपर्यंत काँक्रीट रस्ता बनवण्यात आलेला आहे. पुढे अर्धा किलोमीटरपर्यंंंंंत आदिवासी लोकवस्ती असून ररत्याचे मध्येच काम थांबलेले आहे. त्याला खूप वर्षे लोटली, परंतु माती टाकण्याचे काम अजूनपर्यंत झालेले नाही. वारंवार खड्डे पडून रस्त्यांवर मातीची दलदल तयार झाली आहे. नगरपरिषदेने कायम दुर्लक्ष केल्यामुळे या परिसराची दुरवस्था झालेली आहे. पावसाळ्यात विजेचा लपंडाव असताना सर्पदंशाच्या भीतीमळे रात्रीचा प्रवास जीव मुठीत घेऊनच करावा लागतो. काही ठिकाणी रस्त्यावर दिव्यांची सोय नाही. नगरपरिषदेने इकडे लक्ष घालून मुख्य रस्त्याचे काम हाती घेण्यात यावे तसेच वीज आणि शुद्ध पाणी देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.