ठाणे : गेल्या दोन महिन्यांपासून वेगवेगळ्या मोबाइलवरून चोवीसवर्षीय विवाहितेची छेड काढणा-या हरीश शेगोठ (२०, रा. खामकरवाडी, कुंटवली, अंबरनाथ) याला श्रीनगर पोलिसांनी गुरुवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास अटक केली आहे. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.‘मुझसे बात करना, तेरी आवाज बहुत अच्छी लगती है, मुझे तेरेको मिलना है’, अशा वेगवेगळ्या प्रकारे तो या विवाहितेला फोन करून त्रास देत होता. १८ जून २०१८ पासून त्याचा हा विकृतपणा सुरूच होता. कधी मित्रांच्या, कधी नातेवाइकांच्या, तर कधी रस्त्याने जाणा-यांचा फोन तो घ्यायचा. मला घरी आईला अर्जंट फोन करण्याचे कारण सांगून मिळवलेल्या दुस-यांच्या फोनवरून तो या महिलेसह अन्यही काही महिलांना फोन करून त्रास देत होता. वारंवार होणा-या या छेडछाडीला कंटाळून या महिलेने श्रीनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी १८ आॅगस्ट २०१८ रोजी अखेर विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुलभा पाटील यांनी याची गंभीर दखल घेऊन १८ ते २२ आॅगस्टदरम्यान त्याच्याकडून येणाºया फोनवर तसेच याआधी आलेल्या फोनचीही पडताळणी करून त्याला अंबरनाथमधून अटक केली. पोलीस उपनिरीक्षक उमा गावडे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
ठाण्यातील विवाहितेची दोन महिन्यांपासून छेड काढणारा अखेर गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 20:09 IST
कधी मित्रांच्या, कधी नातेवाइकांच्या, तर कधी रस्त्याने जाणाऱ्यांचा फोन घेऊन ठाण्यातील एका विवाहितेशी अश्लील संभाषण करुन छेड काढणा-या हरीश शेगोठ ( रा. अंबरनाथ) याला श्रीनगर पोलिसांनी गुरुवारी अटक केली आहे.
ठाण्यातील विवाहितेची दोन महिन्यांपासून छेड काढणारा अखेर गजाआड
ठळक मुद्देश्रीनगर पोलिसांनी केली कारवाई मोबाईलवरुन अश्लील संभाषण नातेवाईकांच्या फोनचा केला वापर