बसमध्ये विवाहितेची छेड काढणाऱ्या युवकाला अकोला बसस्थानकावर बदडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 05:25 PM2017-12-22T17:25:19+5:302017-12-22T17:29:33+5:30

अकोला: एसटी बसमध्ये एका विवाहितेच्या अंगाला स्पर्श करून तिची छेड काढणाऱ्या युवकाला विवाहितेसह काही नागरिकांनी चांगलेच चोपून काढल्याची घटना शुक्रवारी दुपारी नवीन बसस्थानकाजवळ घडली.

A young man, who was harassing a married man on a bus, turned to Akola bus station | बसमध्ये विवाहितेची छेड काढणाऱ्या युवकाला अकोला बसस्थानकावर बदडले

बसमध्ये विवाहितेची छेड काढणाऱ्या युवकाला अकोला बसस्थानकावर बदडले

Next
ठळक मुद्देबसमधून उतरल्यावर महिलेने जाब विचारत युवकाला चांगलाच चोप दिला.शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे प्रमुख विलास पाटील यांनी युवकाला पकडून सिव्हील लाईन पोलिसांच्या ताब्यात दिले. 

अकोला: एसटी बसमध्ये एका विवाहितेच्या अंगाला स्पर्श करून तिची छेड काढणाऱ्या युवकाला विवाहितेसह काही नागरिकांनी चांगलेच चोपून काढल्याची घटना शुक्रवारी दुपारी नवीन बसस्थानकाजवळ घडली. शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे प्रमुख विलास पाटील यांनी युवकाला पकडून सिव्हील लाईन पोलिसांच्या ताब्यात दिले. 
एसटी बसमध्ये बसलेल्या एका विवाहितेच्या अंगाला स्पर्श करून तिची छेड काढणारा संजय देवराव ताम्बे(३0 रा. वडगाव वाटोदा ता. मुर्तिजापूर) याला विवाहितेने हटकले. तेव्हा संजय ताम्बे हा पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. महिलेने त्याचा पाठलाग करून त्याला बसस्थानकाजवळील पत्रकार कॉलनीकडे जाणाऱ्या मार्गावरील एका हॉटेलजवळ पकडले. त्याला चोप देण्यास सुरूवात केल्यानंतर गोळा झालेल्या नागरीकांना सुद्धा नेमका प्रकार लक्षात आला आणि नागरीकांच्या गर्दीतील अनेकांनीही सुद्धा युवकाला चांगलाच चोप देत, हात धुवून घेतले. हा प्रकार गस्तीवर असलेले शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक विलास पाटील व त्यांच्या सहकाºयांना कळला. त्यांनी घटनास्थळावर धाव घेत, संजय ताम्बे याला ताब्यात घेतले आणि त्याला सिव्हील लाईन पोलिसांच्या ताब्यात दिले.  विवाहितेच्या तक्रारीनुसार सिव्हील लाईन पोलिसांनी आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी) 

Web Title: A young man, who was harassing a married man on a bus, turned to Akola bus station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.