शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

ओमींनी केला युतीचा पराभव

By admin | Updated: October 26, 2016 05:23 IST

उल्हासनगर महापालिका निवडणुकीच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनू पाहात असलेले ओमी कलानी यांचा भाजपा प्रवेश लांबला असला, तरी परिवहन समिती सभापतीच्या निवडणुकीत

उल्हासनगर : उल्हासनगर महापालिका निवडणुकीच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनू पाहात असलेले ओमी कलानी यांचा भाजपा प्रवेश लांबला असला, तरी परिवहन समिती सभापतीच्या निवडणुकीत त्या पक्षाच्या बंडखोराला पाठिंबा देत त्यांनी मंगळवारी शिवसेनेला धूळ चारली आणि युतीलाही पराभवाचा धक्का दिला.या निवडणुकीत भाजपाचे बंडखोर मोहन रामवानी विजयी झाले. त्यांनी शिवसेनेचे कृष्णदत्त तिवारी यांचा पराभव केला. दोघांनाही समसमान सहा मते मिळाल्याने चिठ्ठीच्या आधारे रामवानी विजयी झाल्याचे पीठासीन अधिकारी व ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी घोषित केले. या पदासाठी राष्ट्रवादीचे दिलीप मिश्रा, शिवसेनेचे कृष्णदत्त तिवारी यांच्यासह विद्यमान सभापती व भाजपाचे बंडखोर मोहन रामवानी यांनी अर्ज भरले होते. तिवारी आणि मिश्रा यांच्यात थेट लढत होऊन शिवसेनेचे तिवारी विजयी होतील, असा अंदाज होता. मात्र ओमी कलानी टीमने सूत्रे हालवत बंडखोर मोहन रामवानी यांना पाठिंबा देऊन विजयी केले. परिवहन समितीत शिवसेनेचे तीन, भाजपाचे दोन, रिपाइंचा एक, राष्ट्वादीचे तीन, साई पक्षाचे दोन, काँग्रेसचा एक, स्थायी समिती सभापती सुनील सुर्वे असे १३ सदस्यांचे बळ आहे. निवडणुकीपूर्वी मिश्रा यांनी अर्ज मागे घेतला. काँग्रेसचा उमेदवार तटस्थ राहिला. तिवारी व रामवानी यांना प्रत्येकी ६ मते मिळाली. ‘युतीचा पराभव हेच ध्येय्य’ओमी कालानी, मोहन लासी, कमलेश निकम, कुमारी ठाकूर यांच्या खेळीने शिवसेना-भाजपाला धक्का मिळाला. दशकभराच्या सत्ता काळात एकही योजना पुर्ण न करून शकलेल्या महायुतीने शहर बकाल केल्याचा आरोप ओमी यांनी केला. सेनेसह भाजपातील दिग्गजांचा पालिका निवडणुकीत पराभव करण्याचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. टीमने दिला धक्का : ओमी टीमच्या खेळीतून रामवानी यांची निवड झाली. शिवसेनेला धक्का बसला. ओमी टीम महायुतीवर भारी पडली आणि त्यांनी युतीला धक्का दिल्याचे मानले जाते.