कल्याणच्या बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील हावभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:47 IST2021-09-14T04:47:17+5:302021-09-14T04:47:17+5:30

डोंबिवली : मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोनालिसा रेस्टॉरंट आणि बारमध्ये कोरोनाचे नियम धाब्यावर बसविल्याचे पोलिसांच्या छाप्यात रविवारी आढळून आले. ...

Obscene gestures of female waiters in Kalyan bar | कल्याणच्या बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील हावभाव

कल्याणच्या बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील हावभाव

डोंबिवली : मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोनालिसा रेस्टॉरंट आणि बारमध्ये कोरोनाचे नियम धाब्यावर बसविल्याचे पोलिसांच्या छाप्यात रविवारी आढळून आले. कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांना या ठिकाणी महिला वेटर विनामास्क, तसेच तोकड्या कपड्यांत ग्राहकांशी अश्लील हावभाव करताना निदर्शनास आल्या. याप्रकरणी केलेल्या कारवाईत बारचालक, मॅनेजर, वेटर महिला व ग्राहक अशा ५६ जणांना ताब्यात घेऊन त्यांना मानपाडा पोलिसांच्या हवाली करण्यात आले.

कल्याण पूर्वेकडील हाजी मलंग रोडवर हा बार आहे. या ठिकाणी कोरोना नियमांचे उल्लंघन करून गाण्यांवर महिलांचे अश्लील हावभाव आणि कृत्य सुरू होते. स्थानिक मानपाडा पोलिसांनी याकडे कानाडोळा केल्याने कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्या पथकाने येथे छापा टाकला. यावेळी बार मालक आणि चालकाकडे परवाना नसतानाही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तोकडे कपडे घातलेल्या महिलांचा वेटर म्हणून वापर सुरू होता. या महिला वेटर तोकडे कपडे परिधान करून अश्लील कृत्य करताना आढळल्या. तसेच बारमध्ये सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडाला होता. बारमधून ५६ जणांना ताब्यात घेण्यात आले. यात २१ महिला वेटर, ३० ग्राहक, बारचालक आणि अन्य वेटर अशा पाचजणांचा समावेश आहे. पोलिसांनी ६३ हजार ४१० रुपयांची रोकड आणि १४ हजार ५०० रुपयांचे गाणी वाजविण्याचे साहित्य असा ७७ हजार ९१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

-----------------------------------

Web Title: Obscene gestures of female waiters in Kalyan bar