शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
4
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
5
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
6
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
7
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
8
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
9
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
10
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
11
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
12
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
13
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
14
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
15
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
16
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
17
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
18
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
19
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर

रेल्वे अपघातांच्या संख्येत घट होऊनही मृतांची संख्या २० ने वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 23:57 IST

पाच वर्षांत २५३८ अपघात : १२२२ जणांचा मृत्यू, जखमींची संख्या झाली कमी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात मागील पाच वर्षांत दोन हजार ५३८ रेल्वे अपघात झाले. यामध्ये एक हजार १२२ जणांचा बळी गेला असून एक हजार ४१६ जण जखमी झाले आहेत. २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये अपघातांची संख्या २९ ने घटली असली तरी मृतांची संख्या मात्र २० ने वाढली आहे. जखमींची संख्याही ४९ ने घटल्याची माहिती सूत्रांनी दिली.कोपरी ते दिवा आणि दिवा ते निळजे अशी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याची हद्द पसरली आहे. ही हद्द पूर्णपणे कुठेही बंदीस्त नसल्याने रेल्वे रूळाशी नागरिकांचा संपर्क येताना दिसतो. लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ठाणे असो वा कळवा, मुंब्रा आणि दिवा या रेल्वेस्थानकांवर दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढत आहे. ठाण्यातून रेल्वेने दररोज ८-९ लाख प्रवासी येजा करतात. सकाळी आणि सायंकाळी लोकलला असणाऱ्या गर्दीमुळे प्रवासी अक्षरश: लटकून येजा करतात. यामुळे लोकलमधून पडण्याचे प्रमाण तसेच घाईगडबडीत रेल्वे रूळ ओलांडताना होणाºया अपघातांमध्ये मध्यंतरी वाढ झाली होती.जीआरपी आणि आरपीएफची जनजागृतीच्अपघात रोखण्यासाठी ठाणे जीआरपी आणि आरपीएफ पोलिसांनी संयुक्तरीत्या वेगवेगळ्या उपाययोजना राबवून जनजागृती मोहीम हाती घेतली. त्याचबरोबर रेल्वेस्थानकातील शॉर्टकट बंद करण्यावरहीभर दिला.च्२०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये हे प्रमाण कमी झाले आहे. अपघातातील मृतांची ओळख पटवणेही जोखमीचे काम असते. त्यांना बेवारस न ठेवता त्यांची ओळख पुढे आणण्याचे काम प्रामुख्याने केले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.मृतांची संख्या २० ने वाढली२०१८ मध्ये अपघातांमध्ये २०३ जणांचा बळी गेला होता. यातील ११४ जणांची बेवारस म्हणून नोंद करण्यात आली होती. २०१९ मध्ये ही संख्या २० ने वाढल्याने बळींची संख्या २२३ वर पोहोचली. मात्र, बेवारस मृतांची संख्या कमी होऊन ती संख्या ७० वर आली आहे. २०१८ मध्ये जखमींची संख्या ३१९ होती, २०१९ मध्ये ती ४९ ने कमी झाल्याची सूत्रांनी दिली.चिठ्ठीवरून बेवारसाची ओळखमध्यंतरी निळजे येथे झालेल्या एका अपघातात डोंबिवली येथे राहणारा अजयकुमार शर्मा (२८) याचा मृत्यू झाला होता. त्याच्याकडे सापडलेल्या एका चिठ्ठीवरून तो मध्यप्रदेश येथील रहिवासी असल्याचे पुढे आले होते. चिठ्ठीवरील एका फोन नंबरवरून त्याची ओळख समोर आली.