शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीपूर्वीच ‘सागर’ बुडाली

By admin | Updated: May 14, 2017 22:36 IST

बदलापूरमधील सागर इन्व्हेस्टमेंट ही कंपनी नोटाबंदीच्या काळात बुडाली, असा दावा गुंतवणूकदार करत आहेत. मात्र, सागर इन्व्हेस्टमेंटची पैसे फिरवण्याची साखळी ही आधीच तुटलेली होती

लोकमत न्यूज नेटवर्कबदलापूर :बदलापूरमधील सागर इन्व्हेस्टमेंट ही कंपनी नोटाबंदीच्या काळात बुडाली, असा दावा गुंतवणूकदार करत आहेत. मात्र, सागर इन्व्हेस्टमेंटची पैसे फिरवण्याची साखळी ही आधीच तुटलेली होती. तीन ते चार वर्षांपूर्वी व्याजदर कमी करून त्यांनी गुंतवणूकदारांना त्याची हलकीशी कल्पनाही दिली होती. मात्र, जास्त व्याजदराच्या लोभात सागर इन्व्हेस्टमेंटमध्ये निर्माण झालेली आर्थिक कोंडी गुंतवणूकदारांच्या लक्षातच आली नाही. केवळ नोटाबंदीचा आधार घेऊन सागर इन्व्हेस्टमेंटने कंपनी बुडाल्याचे जाहीर केले आहे. २८ वर्षांपासून जास्त व्याजदर देणारी आणि शेकडो गुंतवणूकदारांचे पैसे फिरवणारी सागर इन्व्हेस्टमेंट कंपनी बुडीत निघाली आहे. त्यामुळे शेकडो गुंतवणूकदारांचे पैसे त्यात अडकले. गुंतवणूकदारांचेच पैसे अन्य गुंतवणूकदारांचे व्याज देण्यासाठी वापरण्यात येत होते. व्याजदर जास्त मिळत असल्याने सर्वसामान्यांनीही दोन लाखांपासून २० लाखांपर्यंतची गुंतवणूक केली होती. त्यात शहरातील काही बड्या उद्योजकांनीही जास्त व्याजासाठी २५ लाखांपासून ते १ कोटीपर्यंतची गुंतवणूक केली होती. २८ वर्षे न चुकता व्याज मिळत असल्याने सागर इन्व्हेस्टमेंटच्या अनेक शाखा पुणे, ठाणे, डोंबिवली येथे सुरू झाल्या. आलेलीच रक्कम व्याजाच्या स्वरूपात फिरवण्याचा हा व्यवसाय कुठेतरी अडचणीत येणार, याची कल्पना सागर इन्व्हेस्टमेंटचे प्रमुख श्रीराम समुद्र, अनघा समुद्र, भक्ती समुद्र, सुहास समुद्र आणि सुनरता समुद्र यांना होती. मात्र, जोपर्यंत सुरू आहे, तोपर्यंत व्यवसाय सुरूच ठेवण्याचा निर्णय समुद्र कुटुंबीयांनी घेतला होता. अखेर, या साखळीचा शेवट नोव्हेंबर २०१६ मध्ये नोटाबंदीच्या काळात झाला. नोटाबंदीमुळे कोट्यवधी रुपये वाया गेल्यानेच कंपनीला उतरती कळा लागली, अशी अफवा शहरात पसरवण्यात आली. मात्र, ही कंपनी नोटाबंदीनिमित्ताने बुडाली, हे दर्शवण्याचा प्रयत्न समुद्र कुटुंबीयांनी केला. नोटाबंदीच्या काळात सागर इन्व्हेस्टमेंटकडे कोट्यवधी रुपये पडून होते, असा अंदाज जरी काढला तरी त्याचे संचालक ही रक्कम आपल्या गुंतवणूकदारांना व्याजाच्या स्वरूपात वाटून जुन्या नोटा बाहेर काढू शकत होते. गुंतवणूकदारांना व्याजाच्या स्वरूपात आलेली रक्कम गुंतवणूकदार आपल्या जबाबदारीवर बँकेत भरणेही शक्य होते. मात्र, नोटाबंदीच्या काळातही सागर इन्व्हेस्टमेंटकडे जुन्या नोटा नव्हत्या, हे उघड होते.