झाडे, डोंगर नष्ट करून कारशेड नको, २१ हजार नागरिकांच्या सह्यांसह आयुक्तांना आयुक्तांना निवेदन

By धीरज परब | Updated: June 17, 2025 10:21 IST2025-06-17T10:21:35+5:302025-06-17T10:21:59+5:30

Mira Road: मीरारोड व भाईंदर पश्चिम भागात मेट्रो कारशेडसाठी मोकळ्या मुबलक जागा असताना डोंगरीच्या डोंगरावरील १२ हजार ४०० झाडे  तोडण्यास विरोध करणाऱ्या सुमारे २१ हजार पेक्षा जास्त नागरिकांच्या सह्यांसह विविध संस्था, संघटना, नागरिकांच्या तक्रारींची निवेदने सोमवारी महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांना देण्यात आली.

No car sheds by destroying trees and mountains, a memorandum to the Commissioner with signatures of 21,000 citizens | झाडे, डोंगर नष्ट करून कारशेड नको, २१ हजार नागरिकांच्या सह्यांसह आयुक्तांना आयुक्तांना निवेदन

झाडे, डोंगर नष्ट करून कारशेड नको, २१ हजार नागरिकांच्या सह्यांसह आयुक्तांना आयुक्तांना निवेदन

मीरारोड - मीरारोड व भाईंदर पश्चिम भागात मेट्रो कारशेडसाठी मोकळ्या मुबलक जागा असताना डोंगरीच्या डोंगरावरील १२ हजार ४०० झाडे  तोडण्यास विरोध करणाऱ्या सुमारे २१ हजार पेक्षा जास्त नागरिकांच्या सह्यांसह विविध संस्था, संघटना, नागरिकांच्या तक्रारींची निवेदने सोमवारी महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांना देण्यात आली.

सोमवारी शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या आई आणि निर्धार प्रतिष्ठानच्या अध्यक्षा ज्योती राणे, भाईंदर - धारावी बेटचे डीन रडवर्ड जसिंटो, डोंगरीचे फादर ऑस्कर मेंडोन्सा, माजी नगरसेविका शर्मिला बगाजी, राजीव मेहरा, मनसे उपजिल्हाध्यक्ष हेमंत सावंत, सत्यकाम फाउंडेशनचे ऍड. कृष्णा गुप्ता, फॉर फ्युचर इंडियाचे हर्षद ढगे, गो ग्रीन फाउंडेशनचे वीरभद्र कोनापुरे आदींच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेतली. शहरात विविध भागातील सह्यांची मोहीम व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे केलेल्या सह्यांचे निवेदन ज्योती राणे व एडवर्ड जसिंटो यांच्या हस्ते आयुक्तांना देण्यात आले.

इतक्या मोठ्या संख्येने झाडे तोडण्यास लोकांचा विरोध असून लोकां मध्ये ह्या बद्दल अशांतता आहे. भावी पिढीचा विचार करून कारशेड अन्यत्र करावी, झाडे तोडू नये अशी मागणी राणे यांनी आयुक्तां कडे केली. डोंगरीच्या डोंगरावरील झाडे हि स्थानिकांनी पिढ्या न पिढ्या जपली. त्या निसर्गरम्य डोंगराचे संरक्षण केले. ती झाडे व स्थानिकांची घरे नष्ट करू नका असे एडवर्ड जसिंटो म्हणाले. 

Web Title: No car sheds by destroying trees and mountains, a memorandum to the Commissioner with signatures of 21,000 citizens