मीरा भाईंदर पालिका शिवसेना गटनेते पदी नीलम ढवण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2020 02:48 PM2020-08-09T14:48:36+5:302020-08-09T15:11:40+5:30

जवळपास गेले दोन महिने गटनेते पद हे रिक्तच होते . महापालिकेची महासभा येत्या 13 ऑगस्ट रोजी ऑनलाईन पद्धतीने आयोजित केली गेली आहे.

Neelam Dhawan as Mira Bhayander Palika Shiv Sena group leader | मीरा भाईंदर पालिका शिवसेना गटनेते पदी नीलम ढवण 

मीरा भाईंदर पालिका शिवसेना गटनेते पदी नीलम ढवण 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेतील शिवसेना गटनेते हरिश्चंद्र आमगावकर यांचे  कोरोना मुळे निधन झाल्याने या रिक्त गटनेते पदी शिवसेना नगरसेविका नीलम ढवण यांची नियुक्ती करण्यात आली आहे . 

 

शिवसेनेचे पालिकेतील गटनेते हरिश्चंद्र आमगावकर यांचे ९ जून रोजी कोरोना मुळे निधन झाले होते . दुसऱ्या दिवशी १० ऑगस्ट रोजी आमगावकर यांच्या वाढदिवशी त्यांच्या आईचा देखील कोरोना मुळे मृत्यू झाला होता . या घटनेने शहरात हळहळ व्यक्त झाली होती . 

 

त्या पासून जवळपास गेले दोन महिने गटनेते पद हे रिक्तच होते . महापालिकेची महासभा येत्या 13 ऑगस्ट रोजी ऑनलाईन पद्धतीने आयोजित केली गेली आहे. अंदाजपत्रकास मंजुरी साठीची हि सभा असून नव्या गटनेत्याची नियुक्ती करणे गरजेचे होते . त्या अनुषंगाने शिवसेनेच्या पालिकेतील गटनेते पदी नीलम ढवण यांची नियुक्ती केली गेली आहे . या आधी देखील पालिकेत ढवण यांनी गटनेते पदाची जबाबदारी सांभाळली होती . त्या भाईंदर पूर्व भागातून नगरसेविका असून महिला आघाडीच्या शहर प्रमुख आहेत. 

Web Title: Neelam Dhawan as Mira Bhayander Palika Shiv Sena group leader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.