कल्याणमध्ये इंधन दरवाढीच्या निषेधार्थ हल्लाबोल आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2018 01:33 PM2018-09-03T13:33:26+5:302018-09-03T13:44:18+5:30

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कल्याण-डोंबिवली जिल्हा तर्फे इंधन दरवाढीच्या विरोधात पेट्रोलपंपावर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.

ncps agitation against fuel price hike in kalyan | कल्याणमध्ये इंधन दरवाढीच्या निषेधार्थ हल्लाबोल आंदोलन

कल्याणमध्ये इंधन दरवाढीच्या निषेधार्थ हल्लाबोल आंदोलन

Next

कल्याण : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कल्याण-डोंबिवली जिल्हा तर्फे इंधन दरवाढीच्या विरोधात पेट्रोलपंपावर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. तसेच काळ्या फिती लावून निदर्शने ही करण्यात आली.    

पेट्रोल-डिझेलच्या अमर्यादीत दरवाढी विरोधात कल्याण पश्चिम बैलबाजार चौकातील पेट्रोलपंपावरून हे आंदोलन सुरू करण्यात आले. शिवाजी चौक-नारायण वाडी मार्गे महमद अली चौक-नेहरु चौक-स्टेशन रोड मार्गे कल्याण तहसील कार्यालय परिसरात येऊन हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. यावेळी पक्षाचे जिल्ह्यातील पदाधिकारी, सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.
 

Web Title: ncps agitation against fuel price hike in kalyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.