शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

नाट्यसंमेलनाला ठेंगा अन शिवसेनेशी पंगा

By admin | Updated: February 23, 2016 02:24 IST

विदेशी शिष्टमंडळासोबत बैठक असल्याचे सांगत नाट्यसंमेलनातून लवकर काढता पाय घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी भाजपाचे मोजके पदाधिकारी सोबत घेत ठाण्याचे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल

ठाणे : विदेशी शिष्टमंडळासोबत बैठक असल्याचे सांगत नाट्यसंमेलनातून लवकर काढता पाय घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी भाजपाचे मोजके पदाधिकारी सोबत घेत ठाण्याचे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यासोबत जवळपास दीड तास खलबते केल्याने शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे. या वेळी त्यांच्यासोबत ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग असल्याने विरोधकांची नेमकी कोणती प्रकरणे बाहेर काढली जातात किंवा त्यांच्या कोणत्या प्रकरणांवर अधिक लक्ष दिले जाते, या चर्चेला उधाण आले आहे. पुढच्या वर्षी होणारी पालिकेची निवडणूक, परमार प्रकरणाचा तपास, बाळाराम म्हात्रे खून प्रकरणाला २५ वर्षांनी फुटलेली वाचा, शहरातील वेगवेगळे प्रश्न, मंजुरीच्या प्रतीक्षेतील अर्थसंकल्प, स्मार्ट ठाण्याचे आश्वासन असे अनेक मुद्दे सध्या तेजीत असतानाच खुद्द आयुक्तांसोबत खलबते झाल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली. परिणामी, मुख्यमंत्र्यांनी थाप मारत, शिवसेनेसह नाट्यरसिकांना अंधारात ठेवत पालिका आणि पोलीस आयुक्तांकडून ठाणे काबीज करण्यासाठी बरीच माहिती गोळा केल्याची चर्चा दिवसभर रंगली. नाट्यसंमेलनाच्या समारोपावेळी विदेशी शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्र्यांची बैठक असल्याने कार्यक्रम घाईत उरकण्यात आला. मेक इन महाराष्ट्रची एखादी बैठक असेल, असे गृहीत धरून संमेलनाचे आयोजक असलेल्या शिवसेनेनेही ती बाब फारशी मनावर घेतली नाही. पण, भाजपाचे पदाधिकारी, पोलीस आयुक्तांसोबत ते पालिका आयुक्तांच्या बंगल्यावर गेल्याचे कळताच कलारजनीच्या वेळी उपस्थित असलेल्या शिवसेनेच्या नेत्यांत प्रचंड अस्वस्थता पसरली. संमेलनाच्या व्यासपीठावर शिवसेनेने मुख्यमंत्र्यांना मेट्रोची प्रतिकृती भेट दिली आणि हा प्रकल्प लवकर मार्गी लावावा, असे सुचवले. त्यावर, चार वर्षांत मेट्रो धावेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगून वेळ मारून नेली. शिवसेनेच्या नेत्यांनी मेट्रोच्या प्रश्नावर उपोषणाचा इशारा दिल्याने मुख्यमंत्र्यांनी वेळ मारून नेण्यासाठी ही खेळी खेळल्याचे मानले जाते. पुढील कार्यक्र माला जायचे असल्याने सत्कार सोहळ्याची, भाषणांची संख्या कमी करण्याची सूचना त्यांनी केली. त्यामुळे शिवसेना नेते खासदार संजय राऊत, शिवसेनेचेच अन्य नेते केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनीही मोजक्या शब्दांत भावना व्यक्त केल्या. त्यांना फारशा मागण्या मांडता आल्याच नाहीत. त्यानंतर, मुंबईला निघालेले मुख्यमंत्री भाजपा पदाधिकाऱ्यांसोबत थेट आयुक्तांच्या बंगल्यावर पोहोचले. मुख्यमंत्र्यांनी वैयक्तिक मैत्री जपल्याचे भाजपाच्या काही पदाधिकाऱ्यांना खाजगीत सांगितले.