शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पालिका निवडणुकीत लोकसभेची नांदी

By admin | Updated: February 20, 2017 05:49 IST

उल्हासनगर, ठाणे, मुंबई आणि अन्य महानगरपालिकांच्या निवडणुका ही आगामी लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल आहे

उल्हासनगर : उल्हासनगर, ठाणे, मुंबई आणि अन्य महानगरपालिकांच्या निवडणुका ही आगामी लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल आहे. त्याची नांदी आहे. त्यामुळे नागरिकांनी विचारपूर्वक मतदान करून भाजपासह इतर जातीयवादी पक्षांना मतदान करू नये, असे आवाहन भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले.उल्हासनगरच्या कॅम्प-४ येथील सुभाष टेकडी परिसरात सिद्धार्थ स्नेह मंडळाच्या मैदानात शनिवारी दुपारी भारिप बहुजन महासंघाच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा झाली. त्यात आंबेडकर यांनी मतदारांना हे आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नोटाबंदीचा निर्णय चुकीचा ठरला असून त्याचे परिणाम आजही लोकांना भोगावे लागत आहेत. या निर्णयामुळे शेतकरी, व्यापारी, कारखानदार आणि सर्वसामान्य देशोधडीला लागले आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कोणतेच मुद्दे नसल्यामुळे ते लहान मुलांसारखे भांडत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. अगरबत्ती व मेणबत्ती लावून डॉ. बाबासाहेब आंबेडकर समजत  नाहीत, तर त्यांचे अर्थव्यवस्थेबाबतचे विचार वाचून ते ज्ञान घेतले असते;  तर आजच्या परिस्थितीत अर्थव्यवस्था कशी असावी, त्याचे ज्ञान या  लोकांना मिळाले असते, असा  टोला त्यांनी भाजपाला लगावला. लोकांनी भांडवलदारांच्या पक्षांना निवडून दिल्यास ते निवडून आल्यानंतर तुमच्याकडे ढुंकूनही बघणार नाहीत. भारिप बहुजन महासंघ जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असून आमच्या १३ उमेदवारांना निवडून द्यावे, असे आवाहन आंबेडकर यांनी केले. या वेळी भारिप बहुजन महासंघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद मोहन, निरीक्षक दादा डांगळे, सारंग थोरात, शहराध्यक्ष शेषराव वाघमारे, युवक अध्यक्ष रितेश गणवीर, महिला अध्यक्ष संगीता नेरकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)