शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

मांडा महापालिकेत की ग्रा.पं.त?

By admin | Updated: June 8, 2015 23:20 IST

अपुऱ्या रस्त्यांमुळे वाहातूक कोंडीचा प्रश्न, गटारे भरून वाहत आहेत, कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न अशा प्रकारच्या विविध समस्यानी ग्रासलेला प्रभाग क्रमांक ५ मांडा समस्यांचे माहेरघर बनलेला आहे.

उमेश जाधव, टिटवाळाअपुऱ्या रस्त्यांमुळे वाहातूक कोंडीचा प्रश्न, गटारे भरून वाहत आहेत, कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न अशा प्रकारच्या विविध समस्यानी ग्रासलेला प्रभाग क्रमांक ५ मांडा समस्यांचे माहेरघर बनलेला आहे. प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या उदासीनतेमुळेच या प्रभागाची ही अवस्था अशी असल्याचे संतप्त नागरिकांचे म्हणणे आहे.कल्याण डोंबिवली महानगर पालिकेची स्थापनेपासून मांडा (कोळीवाडा) हे गांव पालिकेच्या अ प्रभागाचे प्र.क्र ५ म्हणून घोषीत करण्यात आले. या प्रभागाचा गेली २५ वर्षात पाहिजे तसा विकास झाला नाही. येथून लगतच्या वासुंद्री, सांगोडा, कोंढेरी इतर गांवातील नागरीकांना प्रवास करतांना वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत आहे. ग्रामपंचायत काळातील गावातील तुटलेली व घाणीने भरलेली गटारे यामुळे आरोग्याच्या प्रश्नाने रहिवासी हैराण होत आहेत. पिण्याच्या पाण्याच्या पाईप लाईन याच गटारातून गेल्याने लिकेज होऊन गटाराच्या दूषित पाण्याचा पुरवठा होण्याच्या घटना सतत घडत आहेत. गटारांच्या कामासाठी महिन्याभरापासून तेजस्विनी पॅलेस समोर खोदकाम करून ठेवले आहे. उमा दर्शन सोसायटीसमोर देखील तीच अवस्था. यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. आता पावसाळा तोंडावर आल्याने याचा मोठ्या प्रमाणात नागरीकांना त्रास होणार आहे. जागोजागी पसरलेल्या कचऱ्याचे ढिगारे उचलण्यास पालिका प्रशासन असमर्थ असल्याची ओरड नागरीक करत आहेत. ग्रामपंचायत कार्यालयातच सध्या पालिकेचे कामकाज चालते. तेच टेबल, त्याच खुर्च्या आणि तीच कपाटे. आजतागायत या कार्यालयाचा कायापालट करण्याता प्रयत्न ना स्थानिक नगरसेवक, पालिका प्रशासनाने केला नाही. पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या उदासिनतेमुळेच प्रभागाचा विकास खुंटल्याची ओरड नागरिक करत आहेत. पालिका प्रशासन फक्त नागरिकांकडून कर वसुलीचे काम मात्र इमानदारीने करत आहे. रस्त्याच्या कामाचेही तेच. नगरसेवक बुधाराम सरनोबत यांनी वारंवार प्रशासनाकडे ठेकेदाराच्या मनमानी कामासंदर्भात फक्त तक्रारी केल्या आहेत. प्रशासन या ठेकेदारास पाठिशी घालत असल्याचा कांगावा देखील सरनोबत करत आहेत. या प्रभागाचा विकास होण्याकरिता अद्याप १५ वर्षाचा कालावधी देखील कमी पडेल असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या उदानिसनतेमुळेच प्रभागाचा विकास खुंटला आहे.कल्याण डोंबिवली महानगर पालिकेतील सर्वात जास्त प्रशासनाता निधी आणनारा मि नगरसेवक आहे. जवळ जवळ मांडा च्या विकासा करिता मि कोट्यवधींचा निधी मंजूर केला आहे. परंतू पालिका प्रशासन फाईल मंजूर करेणे, टेंडरींग करणे व निधी देण्यास विलंब लावत आसल्यामुळेच विकास कामांना विलंब होत आहे. - बुधाराम सरनोबतनगरसेवक