शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते रुंदीकरणानंतर फेरीवाले झाले मग्रुर

By admin | Updated: May 12, 2017 01:48 IST

फेरीवाला धोरण निश्चित करण्यात तब्बल चार वर्षे आलेले अपयश, या काळात फेरीवाल्यांची चौपट वाढलेली संख्या आणि आता तर नगर पथविक्रेता

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : फेरीवाला धोरण निश्चित करण्यात तब्बल चार वर्षे आलेले अपयश, या काळात फेरीवाल्यांची चौपट वाढलेली संख्या आणि आता तर नगर पथविक्रेता समिती स्थापन करून फेरीवाल्यांना राजकीय अधिष्ठान प्राप्त करून देण्याचा राज्य सरकारचा निर्णय यामुळे ठाण्यातील फेरीवाल्यांची मुजोरी वाढली आहे. महापालिकेने रस्ता रुंदीकरण केल्यावर त्या जागेवर फेरीवाल्यांनी बिनदिक्कत कब्जा करीत व्यापाऱ्यांना आणि महापालिका प्रशासनाला वाकुल्या दाखवल्या आहेत. गावदेवी भागात फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या उपायुक्त संदीप माळवी यांच्यावर फेरीवाल्यांनी हल्ला करण्यापर्यंत त्यांची मजल जाण्यास गेल्या दोनअडीच वर्षांतील घटना कारणीभूत आहेत. आयुक्तपदी संजीव जयस्वाल आल्यावर त्यांनी गेल्या दीड वर्षात ठाण्यातील २०० ते २५० दुकानदारांनी केलेल्या अतिक्रमणांवर कारवाई केली. यामुळे रस्ते मोकळे झाले. ठाणेकरांनी या कारवाईचे तोंडभरून कौतुक केले. मात्र, अल्पावधीत हे मोठे झालेले रस्ते फेरीवाल्यांनी गिळंकृत केले. यामुळे नाराज असलेल्या व्यापाऱ्यांनी महापालिकेचा स्वच्छतेचा कर देण्यास नकार दिला. त्यामुळे पालिका प्रशासन व व्यापारी यांच्यात वाद सुरू झाला. व्यापाऱ्यांना इंगा दाखवण्याकरिता प्रशासनाने त्यांच्या दुकानापुढे कचरा आणून टाकल्याने वाद चिघळला. सर्वच राजकीय पक्षांनी त्यामध्ये उडी घेऊन समेट घडवून आणला. मात्र, फेरीवाल्यांवर काहीच कारवाई होत नसल्याने व्यापारी व काही राजकीय नेते अस्वस्थ होते. त्यामुळे भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी अलीकडेच फेरीवाल्यांवर कारवाई करा आणि एक लाख रुपये मिळवा, असे आव्हान आयुक्तांना दिले. कुणीही आव्हानात्मक भाषा केल्यावर त्याला चोख उत्तर देण्याकरिता ओळखल्या जाणाऱ्या जयस्वाल यांच्या वतीने संदीप माळवी हे बुधवारी बुद्ध पौर्णिमेची सुटी असताना सायंकाळी कारवाईला बाहेर पडले. या वेळी त्यांचा फेरीवाले व नागरिक यांच्याशी वाद झाला. त्याचे पर्यवसान माळवी यांना मारहाणीत झाले. आता फेरीवाल्यांचे समूळ उच्चाटन करण्याचा निर्धार जयस्वाल यांनी केला आहे. मात्र, फेरीवाल्यांची समस्या चिघळण्यास पालिका प्रशासनाचे वेळकाढू धोरणही कारणीभूत आहे. फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी शासन निर्णयानुसार सहा महिन्यांत करणे अपेक्षित असतानाही आज सुमारे चार वर्षे उलटूनही अंमलबजावणी झालेली नाही. याच काळात फेरीवाल्यांमध्ये चौपट वाढ झाली. त्यातच, आता नगर पथविक्रेता समिती गठीत करण्यासाठी निवडणूक घेण्यात यावी, असा शासनाचा नवीन आदेश आहे. परंतु, या निवडणुका कुणी, कशा घ्यायच्या, याचा काहीच उल्लेख नसल्याने पालिकेपुढे पेच निर्माण झाला आहे. आठवडाबाजाराच्या नावाखाली फेरीवाल्यांचे प्रस्थ वाढले आहे. पालिकेने जून २०१४ पासून शहरातील फेरीवाल्यांची नोंदणी करण्यास सुरुवात केली. ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली असून फेरीवाल्यांचा बायोमेट्रीक सर्व्हेदेखील पूर्ण झाला आहे. या सर्व्हेनुसार ठाण्यात सुमारे १० हजारांच्या आसपास फेरीवाले असल्याचे सांगण्यात येते. मात्र, काहींच्या मते प्रत्यक्षात फेरीवाल्यांची संख्या त्यापेक्षा जास्त असून ती दिवसागणिक वाढत आहे. स्टेशन परिसरात व अन्यत्र पालिकेच्या वतीने सतत कारवाई होत असतानादेखील फेरीवाल्यांचे प्रस्थ कमी झालेले नाही. याला जबाबदार ठाणेकर नागरिक आहेत. रेल्वे स्थानकात उतरल्यावर ते याच बेकायदा फेरीवाल्यांकडून साहित्यखरेदी करत असल्याने फेरीवाल्यांचे फावते.