शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

देहदानासाठी एका आईची चळवळ

By admin | Updated: March 27, 2017 05:50 IST

आपल्या मुलाचे देहदान करणाऱ्या आईने अवयवदानाविषयी जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. एक महिन्यापूर्वी

बदलापूर : आपल्या मुलाचे देहदान करणाऱ्या आईने अवयवदानाविषयी जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. एक महिन्यापूर्वी पुण्यात दुचाकीच्या अपघातात ब्रेनडेड झालेल्या आपल्या मुलाचे नेहा बोबडे यांनी देहदान करून ‘मरावे परी अवयवरूपी उरावे’ हा मूलमंत्र घेऊन अवयवदानाविषयी संपूर्ण महाराष्ट्रभर जनजागृती करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी बदलापूरमध्ये त्यांनी अवयवदानाविषयी जनजागृतीपर कार्यक्र म केला. पुण्यात शिकणाऱ्या निशांत बोबडे या तरु णाचा २१ फेब्रुवारीला अपघात झाला. निशांतने हेल्मेट घातलेले होते, मात्र हेल्मेटचा बेल्ट सैल असल्याने अपघातात त्याचे हेल्मेट डोक्यातून फेकले गेले. त्याच वेळी मागून येणाऱ्या भरधाव गाडीच्या धडकेत निशांतच्या डोक्याला जबर मार लागला. निशांतवर उपचार सुरू असताना त्याचे ब्रेनडेड झाले. त्यामुळे निशांत बरा होऊ शकला नाही. आपल्या पोटच्या मुलाची अपघातात झालेली ही अवस्था पाहता निशांतच्या आईवर दु:खाचा डोंगर कोसळला असताना त्यांनी स्वत:ला सावरत त्याचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. समाजात वेगळा आदर्श निर्माण केला. तिथेच न थांबता त्यांनी समाजात जागृती करण्यासाठी स्वत:ला वाहून घेतले आहे. यासाठी त्या संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहेत. निशांत आयटीमध्ये शेवटच्या वर्षात शिकत होता. (प्रतिनिधी)संस्थांना आवाहनशनिवारी बदलापूरमध्ये अवयवदानासंबंधी जनजागृतीचा कार्यक्र म करण्यासाठी आल्या होत्या. आमच्या परिवारातील सगळ्यांनी अवयवदानाचा निर्णय घेतला असून अवयवदान केल्याने दुसऱ्या कुणाला जीवन मिळेल, असे आवाहन करीत बोबडे यांनी सर्व सामाजिक संस्थांनी यात पुढाकार घ्यावा, अशी विनंती केली.