शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भार्इंदरची ३० टक्के पाणीकपात रद्द

By admin | Updated: January 7, 2016 00:39 IST

मीरा-भार्इंदर शहराला लागू केलेली ३० टक्के पाणीकपात आ. नरेंद्र मेहता यांच्या प्रयत्नाने रद्द करण्याचा निर्णय ५ जानेवारीला राज्याच्या लाभ

भार्इंदर : मीरा-भार्इंदर शहराला लागू केलेली ३० टक्के पाणीकपात आ. नरेंद्र मेहता यांच्या प्रयत्नाने रद्द करण्याचा निर्णय ५ जानेवारीला राज्याच्या लाभ क्षेत्र विकास विभागाचे सचिव शि.मा. उपासे यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांमध्ये पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. यामुळे शहराला दिलासा मिळणार असून राष्ट्रवादीच्या पाणीकपातीविरोधातील ८ जानेवारीच्या नियोजित आंदोलनाला चपराक बसली आहे. शहराची लोकसंख्या १२ लाखांवर गेली असून या प्रमाणात शहराला स्टेम व एमआयडीसीकडून होणारा प्रत्येकी ८६ व ५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा अपुरा पडत आहे. राज्य शासनाने शहराला एमआयडीसी कोट्यातून अतिरिक्त १०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा मंजूर केला असून त्यातील २० दशलक्ष पाणीपुरवठा सुरू झाला आहे. उर्वरित ८० पैकी ५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा योजना मार्गी लागली असून ती कार्यान्वित होण्यासाठी सुमारे २ वर्षांचा कालावधी लागणार आहे. वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात सध्याचा पाणीपुरवठा अपुरा असून तो वाढविण्यासाठी प्रशासनासह राजकीय पाठपुरावा सुरू आहे. परंतु, यंदा पाऊस सरासरीपेक्षा कमी पडल्याने शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या आंध्रा धरणात क्षमतेपेक्षा १४८ व बारवी धरणात सुमारे १४२ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे या धरणातून होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे नियोजन १५ जुलै २०१६ पर्यंत सुसह्य व्हावे, यासाठी ३० टक्के पाणीकपातीला सुरुवात केली आहे. पाणीपुरवठ्याच्या ठिकाणांहून शहर सुमारे ४५ किमी शेवटच्या टोकाला असल्याने अगोदरच होणारा पाणीपुरवठा सुमारे ५० तासांवर गेला असताना या कपातीमुळे शहरात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. दरआठवड्याच्या बुधवार ते शुक्रवारदरम्यान पाणीकपातीमुळे खंडित होत असल्याने शनिवार ते रविवारी शहरात पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होत आहे. त्यामुळे शहरवासीयांना कपातीमधून वगळावे, अशी मागणी मेहता यांनी राज्य शासनाकडे केली होती. त्यानुसार शहराची पाणीकपात शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.