शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
2
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
3
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
4
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
5
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
6
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
7
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
8
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
9
वैभव सूर्यवंशीला बाद केल्यावर केलं असं सेलिब्रेशन, अडचणीत सापडला जेमिसन, BCCIने सुनावली अशी शिक्षा  
10
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
11
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
12
मेहुण्याचा अपघाती मृत्यू, तर भावोजींनी त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य;पालघरमध्ये थरकाप उडवणारी घटना
13
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
14
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
15
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
16
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
17
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
18
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
19
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
20
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात महिलांची सोनसाखळी जबरीने चोरी करणाऱ्या अल्पवयीन चोरटयास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 01:04 IST

मोटारसायकलवरुन महिलांची सोनसाखळी जबरीने चोरी करणाºया एका अल्पवयीन चोरटयास कापूरबावडी पोलिसांनी नुकतेच ताब्यात घेतले आहे. त्याच्या अन्य एका साथीदाराचाही शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ठळक मुद्देकापूरबावडी पोलिसांची कारवाईसोनसाखळीसह मोटारसायकलही हस्तगत

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: मोटारसायकलवरुन महिलांची सोनसाखळी जबरीने चोरी करणाºया एका १७ वर्षीय अल्पवयीन चोरटयास कापूरबावडी पोलिसांनी अटक केल्याची माहिती मंगळवारी दिली. त्याच्याकडून जबरी चोरीतील ऐवज तसेच चोरीसाठी वापरलेली मोटारसायकल हस्तगत करण्यात आली आहे.बाळकूम पाडा क्रमांक एक येथील रहिवाशी जुलीयाना रईस (२३) या ९ आॅक्टोबर रोजी रात्री १०.१५ वाजण्याच्या सुमारास बाळकूम नाका येथील साई मंदिराच्या जवळून पायी जात होत्या. त्याचवेळी एका काळया रंगाच्या मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांपैकी मागे बसलेल्याने त्यांच्या गळयातील दहा ग्रॅम वजनाची ५० हजारांची सोनसाखळी जबरीने हिसकावून बाळकूम साकेत रोडकडे पलायन केले. याप्रकरणी १० आॅक्टोबर रोजी कापूरबावडी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा करण्यात आला होता. संबंधित तक्रारदार महिलेने दिलेल्या वर्णनाच्या आधारे मोटारसायकल आणि आरोपींचा कापूरबावडी पोलिसांनी शोध घेण्यास सुरुवात केली. सीसीटीव्ही मध्ये मिळालेल्या चित्रणामध्ये पळालेला चोरटा हा कळवा येथील रहिवाशी असल्याचे आढळले. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अशोक वाघ यांच्या पथकाने या अल्पवयीन चोरटयाला कळवा भागातून सापळा रचून १६ आॅक्टोबर रोजी ताब्यात घेतले. त्याला भिवंडी येथील बालनिरीक्षण गृहात ठेवण्यात आले आहे. त्याच्या अन्य एका साथीदाराचाही शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. सखोल चौकशीमध्ये त्याच्याकडून जप्त केलेली मोटारसायकल त्याने कळवा येथून चोरल्याचे उघड झाले. तर जबरी चोरीसाठी वापरलेली मोटारसायकल त्याने मुलूंड भागातून चोरल्याची त्याने कबूली दिली. त्यांच्याकडून आणखीही गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीRobberyचोरी