शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

ठोकपगारी कर्मचाऱ्यांना किमान वेतन

By admin | Updated: March 23, 2017 01:22 IST

केडीएमसीच्या घनकचरा व्यवस्थापन विभागात ठोकपगारी म्हणून कार्यरत असलेल्या १०५ वाहनचालकांना किमान वेतनाप्रमाणे

कल्याण : केडीएमसीच्या घनकचरा व्यवस्थापन विभागात ठोकपगारी म्हणून कार्यरत असलेल्या १०५ वाहनचालकांना किमान वेतनाप्रमाणे १६ हजार २०० रुपये वेतन अदा करण्याबाबत मांडलेल्या उपसूचनेला बुधवारच्या स्थायी समितीच्या सभेत सर्वपक्षीय सदस्यांनी हिरवा कंदील दाखवला. दरम्यान, या उपसूचनेची तातडीने अंमलबजावणी व्हावी, असे आदेश सभापती रमेश म्हात्रे यांनी प्रशासनाला दिले.घनकचरा व्यवस्थापन विभागात ७५ कायमस्वरूपी तर १०५ ठोकपगारी वाहनचालक आहेत. आता नव्याने घनकचरा तसेच अन्य विभागासाठी कंत्राटी पद्धतीने वाहनचालक घेण्यात येणार आहेत. प्रत्येक वाहनचालकाला १७ हजार १०० रुपये वेतन अदा केले जाणार आहे. प्रशासनाकडून दाखल केलेल्या या प्रस्तावाला बुधवारच्या सभेत मान्यता देण्यात आली. दरम्यान, मागील चार वर्षांपासून कार्यरत असलेल्या ठोकपगारी कर्मचाऱ्यांना केवळ १० हजार वेतन मिळते. जर कंत्राटी वाहनचालकांना १७ हजार १०० रुपये अदा केले जाणार असतील तर ठोकपगारी वाहनचालकांनाही किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन द्यावे, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक व म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे उपाध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी आयुक्त ई. रवींद्रन व महापौर राजेंद्र देवळेकर यांच्याकडे केली होती. त्यानुसार, बुधवारच्या स्थायीच्या सभेत शिवसेनेचे सदस्य मोहन उगले यांनी संबंधित उपसूचना मांडली होती. त्याला सभागृहनेते व सदस्य राजेश मोरे यांचे अनुमोदन लाभले.सर्व वाहनचालकांना किमान वेतन मिळावे, यासाठी ठोकपगारी वाहनचालकांनाही वेतन मिळावे, या उपसूचनेला सर्वपक्षीय सदस्यांनी मान्यता दिली.कंत्राटी वाहनचालकांमध्ये स्थानिकांना प्राधान्य द्यावे, संबंधित वाहनचालक घनकचरा व्यवस्थापन विभागासाठीच वापरण्यात यावेत, अशा सूचनाही सदस्यांच्या वतीने करण्यात आल्या. (प्रतिनिधी)