शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
5
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
6
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
7
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
12
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
13
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
14
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
15
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
16
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
17
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
18
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
19
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
20
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

लक्षावधी गोरगरीब उपाशी

By admin | Updated: November 12, 2016 06:32 IST

बड्या नोटा रद्द झाल्यामुळे हातावर पोट असलेले बांधकाम मजूर, सफाई कामगार, नाका कामगार यांच्यावर अक्षरश: उपासमारीचे संकट कोसळले आहे.

ठाणे : बड्या नोटा रद्द झाल्यामुळे हातावर पोट असलेले बांधकाम मजूर, सफाई कामगार, नाका कामगार यांच्यावर अक्षरश: उपासमारीचे संकट कोसळले आहे. त्यांच्याकडील ५०० रुपयांच्या नोटा कुणी घेत नाही आणि ही नोट कुठे व कशी मोडायची, असा पेच पडल्याने काहींनी दोन दिवस चक्क उपाशी राहण्याचा मार्ग पत्करला आहे.बांधकाम मजूर किंवा तत्सम हातावर पोट असलेल्या परप्रांतीय कामगारांना दिवसाकाठी मजुरी मिळते. ही मजुरी देणारे कंत्राटदार बऱ्याचदा दोनचार दिवसांच्या मजुरीकरिता पाचशे-हजाराच्या नोटा देतात. गेले दोन दिवस हे कामगार या नोटा कुणी स्वीकारत नसल्याने हैराण झाले आहेत. भाषा समजत नाही, वृत्तपत्र व सोशल मीडियाचा दुरान्वये संबंध नाही आणि बँकेत खाते नाही, तर डेबिट-क्रेडिटकार्डांचा प्रश्नच निर्माण होत नाही. अशा या कामगारांकडून आतापर्यंत सहजपणे घेतल्या जाणाऱ्या नोटा आता का स्वीकारल्या जात नाहीत, हे समजण्यातच त्यांचा एक दिवस गेला. त्यानंतर, कामावर जायचे की, बँकेच्या रांगेत उभे राहायचे, या पेचात ते सापडले. अनेकांची कुठल्याही बँकेत खाती नसल्याने आपल्याला तेथे तरी हे पैसे सुटे करून मिळणार किंवा कसे, अशी शंका असल्याने हातावर पोट असलेल्या अनेकांना गेले दोनतीन दिवस धड जेवण मिळालेले नाही.आर्किटेक्ट व बांधकाम कंत्राटदार दिलीप देशमुख म्हणाले की, माझ्याकडे आंध्र प्रदेशातील बांधकाम मजूर काम करतात. मी त्यांना मजुरी देतो. मात्र, सध्या त्यांच्या नोटा कुणी घेत नसल्याने ते गेले दोन दिवस उपाशी आहेत. त्यांची दया आल्याने त्यांना खाऊ घालण्यासाठी बँकेतून पैसे काढायला मी गेलो, तर बँक मला चार हजार रुपयेही देत नाही. समजा, बँकेने मला चार हजार रुपये दिले, तरी मी कुणाकुणाची देणी भागवू की, कामगारांना खायला घालू. त्यामुळे ज्यांनी आयकरापासून व्हॅटपर्यंत सर्व करांचा नियमित भरणा केला आहे, त्यांना तरी वेगळ्या रांगेत उभे करून त्यांच्या गरजेनुसार बँकांनी पैसे उपलब्ध करून दिले पाहिजेत, अशी मागणी देशमुख यांनी केली.