"म्हाडा मुंबईकरांना गिफ्ट देण्याच्या तयारीत, मुंबई-ठाण्यात परवडणारी घरं उभारणार"

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 01:26 PM2020-09-15T13:26:37+5:302020-09-15T13:29:38+5:30

म्हाडातर्फे मुंबई-ठाण्यात परवडणाऱ्या दरातील घरं उभारणार असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

MHADA build affordable houses in Mumbai-Thane says jitendra awhad | "म्हाडा मुंबईकरांना गिफ्ट देण्याच्या तयारीत, मुंबई-ठाण्यात परवडणारी घरं उभारणार"

"म्हाडा मुंबईकरांना गिफ्ट देण्याच्या तयारीत, मुंबई-ठाण्यात परवडणारी घरं उभारणार"

Next

ठाणे - मायानगरी मुंबईत आपल्या स्वत:चं हक्काचं घर असावं, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्न करणार असल्याचं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. म्हाडातर्फे मुंबई-ठाण्यात परवडणाऱ्या दरातील घरं उभारणार असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली. म्हाडा मुंबईतील मोकळ्या जागा खरेदी करुन त्याजागी परवडणाऱ्या दरात घरं उभारणार असल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणाले. 

जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अनेक मंत्री आपल्या पक्षाच्या कार्यालयात जनता दरबार घेतात. जितेंद्र आव्हाडांनी आज मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात जनता दरबार घेतला. यावेळी ते बोलत होते. पूर्व उपनगरातील टागोर आणि कन्नमवार नगर या भागात मोठ्या वसाहती उभ्या करण्याचा मानस गृहनिर्माण मंत्र्यांचा आहे. यासंदर्भात जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व माननीय मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार आहेत. तसेच मुंबई उपनगरात रिकामे असलेले भूखंड ताब्यात घेणार आहे.

मुंबईत जे रिक्त भूखंड आहेत, त्याबाबतचे वाद न्यायप्रविष्ठ आहेत. अशा वाद असलेल्या जमिनी ताब्यात घेऊन परवडणारी घरं बांधता येतील, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. यामुळे सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरातील घर/सदनिका उपलब्ध करुन देता येतील. म्हाडाने 30 ते 40 वर्षापूर्वी कन्नमवार नगरसारख्या भागात म्हाडाच्या गांधीनगर, मोतीलाल नगर यासारख्या 56 वसाहती उभ्या केल्या असल्याचं आव्हाड म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

"सरकारने विवेकबुद्धी गहाण ठेवलीय काय?, हे सरकार आहे की तिघाडीची ईस्ट इंडिया कंपनी?"

डेटिंग वेबसाईट्सद्वारे मोठा 'गेम', हॅकर्सनी चोरला लाखो युजर्सचा डेटा

CoronaVirus News : बापरे! कोरोना लसींच्या चाचण्यांची माहिती लपवताहेत कंपन्या, शास्त्रज्ञांनी केलं अलर्ट

तरुणांसाठी सुवर्णसंधी! 'ही' ई-कॉमर्स कंपनी देणार तब्बल एक लाख लोकांना नोकरी 

जय जिजाऊ, जय शिवराय! योगी सरकारच्या 'त्या' निर्णयावर फडणवीसांचं खास ट्विट, म्हणाले...

Web Title: MHADA build affordable houses in Mumbai-Thane says jitendra awhad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.